लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान समुद्रात बुडालेल्या साईशचा मृतदेह सापडला

लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान समुद्रात बुडालेल्या साईशचा मृतदेह सापडला

  • Share this:

मुंबई, 29 सप्टेंबर : लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान पाण्यात बुडालेल्या साईश मर्देचा मृतदेह पाच दिवसांनंतर अखेर सापडलाय. राजभवनाजवळील किनाऱ्यावर साईशचा मृतदेह सापडला.

23 सप्टेंबर अनंत चतुदर्शीच्या दिवशी लाडक्या बाप्पाला भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाला दुसऱ्यादिवशी सकाळी निरोप देण्यात आला. यावेळी  चौपाटीवर कोळ्यांची बोट उलटली होती.

बाप्पाच्या विसर्जनाला आत समुद्रात जात असताना काही कोळी बांधवांची बोट ही समुद्रात उलटली. यात सुरुवातील कुणीच बुडालं नाही असं वाटत होतं पण याच बोटीवरील साडेतीन वर्षांचा साईश मर्दे हा बेपत्ता झाला होता.

याची खबर कुणालाच लागली नाही. साईश कुठे आढळला नसल्यामुळे संशय बळावला.

साईश हा या बोटीवर होता तोच बेपत्ता झाल्याचं समोर आलंय. अखेर आज पाच दिवसांनंतर राजभवनाजवळील समुद्रकिनाऱ्यावर साईशचा मृतदेह आढळून आला. साईशच्या टी-शर्टवरून त्याची ओळख पटवण्यात आली. त्याचा मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आलाय.

===============================================================================

VIDEO: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी कोळ्यांची बोट उलटली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2018 04:50 PM IST

ताज्या बातम्या