मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'लालबागचा राजा' मंडळात पुन्हा एकदा पोलीस आणि स्थानिक रहिवाशांमध्ये वाद, Watch Video

'लालबागचा राजा' मंडळात पुन्हा एकदा पोलीस आणि स्थानिक रहिवाशांमध्ये वाद, Watch Video

लालबागचा राजा सार्वजनिक (Lalbaugcha raja 2021) गणेशोत्सव मंडळात काल रात्री पुन्हा एकदा पोलीस
( Mumbai Police) आणि स्थानिक रहिवाशी असा वाद उभा राहिला.

लालबागचा राजा सार्वजनिक (Lalbaugcha raja 2021) गणेशोत्सव मंडळात काल रात्री पुन्हा एकदा पोलीस ( Mumbai Police) आणि स्थानिक रहिवाशी असा वाद उभा राहिला.

लालबागचा राजा सार्वजनिक (Lalbaugcha raja 2021) गणेशोत्सव मंडळात काल रात्री पुन्हा एकदा पोलीस ( Mumbai Police) आणि स्थानिक रहिवाशी असा वाद उभा राहिला.

मुंबई, 11 सप्टेंबर: लालबागचा राजा सार्वजनिक (Lalbaugcha raja 2021) गणेशोत्सव मंडळात काल रात्री पुन्हा एकदा पोलीस

( Mumbai Police) आणि स्थानिक रहिवाशी असा वाद उभा राहिला. गणेशोत्सवात (Ganeshotsav) गणेशभक्त रात्रीच्या वेळी जागरणं करतात. या वर्षी कोविड 19 संसर्गामुळे कडक निर्बंधांसह मार्गदर्शक सूचना जाहीर झालेल्या आहेत. त्यामुळे ज्यांचे दोन डोस झालेले आहेत अशा मर्यादीत कार्यकर्त्यांना परवानगी राज्याच्या गृह विभागाने दिलीय. मात्र असं असतानाही पोलिसांनी रात्रीच्या जागरणाला परवानगी दिली नाही.

त्यातच स्थानिक रहिवाश्यांच्या बिल्डिंग आणि चाळींमध्ये येण्याजाण्याच्या मार्गावर पोलिसांनी बॅरिगेटींग केल्यामुळे बंद करण्यात आलेत. आज पहाटे कामावर जाणाऱ्या रहिवाश्यांना त्यामुळे बाहेरही पडता आले नाही. कामासाठी बाहेर पडणाऱ्या रहिवाशांची त्यामुळे पोलिसांसोबत बाचाबाची झाली. पोलीस जसे पोटापाण्यासाठी त्यांची नोकरी करतायेत तसेच स्थानिक रहिवाशांनाही नोकरी धंदा आहे. त्यांनी पुढील 10 दिवस पोलिसांच्या बँरिगेटींगमुळे घरातच बंदिवासात रहायचं का..? असा प्रश्न लालबागमधील स्थानिक रहिवाशी विचारत होते.

अखेर रात्रभर चाललेल्या या वादावर सकाळी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि वरिष्ठ पोलिसांनी चर्चा करून बिल्डिंग आणि चाळींच्या प्रवेशद्वारावर लावलेले बँरेगेटिंग हटवले आणि स्थानिक रहिवाश्यांनी जाण्या येण्यास मार्ग करून दिला.

मुंबई पोलिसांच्या अती सुरक्षेचा फटका आणि त्यांच्या दंडेलशाही वागण्यामुळे लालबागमधील गणेशोत्सव मंडळं आणि स्थानिक रहिवाशांना वारंवार बसत आहे. यावर आता मुंबई पोलिसांनी माणुसकीच्या नात्याने सर्वसामान्य नागरिक आणि गणेशभक्तांच्या व्यथ्या ऐकून त्या सोडवल्या पाहिजेत. अन्यथा मुंबई पोलीस नायकांच्या भूमिकेतून खलनायकांच्या भूमिकेत जायला वेळ लागणार नाही.

First published:

Tags: Ganesh chaturthi, Mumbai police