लालबाग-परळमध्ये गणेशभक्तांचे 135 मोबाईल चोरीला !

लालबाग-परळमध्ये गणेशभक्तांचे 135 मोबाईल चोरीला !

  • Share this:

मुंबई, 18 सप्टेंबर : दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनला भाविकांची मोठी रिघ लागते. याच गर्दीचा फायदा घेत चोरटे हात साफ करताना दिसत आहेत. 'लालबागचा राजा' परिसरातील काळाचौकी पोलीस स्थानकात चार दिवसांत १३५ मोबाईल चोरीच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. गणेशोत्सवाच्या काळात या परिसरात होणाऱ्या चोऱ्यांची संख्या पाहता यामध्ये सुरत गँग आणि यूपी गँग या दोन टोळ्या कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गणेशोत्सव म्हटल्यावर अनेक मोठ्या शहरांमधील मंडपातील गणपती हे भाविकांचे प्रमुख आर्कषण असतं. अनेकजण तासन तास रांगा लावून मोठ्या मंडपातील गणपतींचे दर्शन घेतात. त्यातही मुबंईमध्ये लालबाग-परळ भागामधील अनेक गणपती मंडळे असल्याने दिवसाबरोबरच रात्रीही भाविकांची गर्दी असते. मात्र याच गर्दीचा फायदा संधीसाधू चोरट्यांनी घेतल्याचे चित्र यंदाच्या गणेशोत्सवात दिसत आहे.

'लालबागचा राजा' परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे खिसे कापण्याचे प्रमाण वाढले आहे. गणेशोत्सव सुरू झाल्यापासून अवघ्या चार दिवसांमध्ये 'लालबागचा राजा' परिसरातील पोलिसांकडे तब्बल १३५ मोबाईल चोरीच्या तक्रारींची नोंद झालीये.

मुंबईमधील लालबाग, परळ भागात मागील काही वर्षांपासून नजर ठेवण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेरांचाही वापर केला जातोय. इतक्या उपाययोजना करुनही भुरटे चोर गर्दीचा फायदा घेऊन मौल्यावन वस्तूंवर हात साफ करताना दिसत आहेत. मागील काही वर्षांमध्ये गणेशोत्सव काळात या परिसरात होणाऱ्या चोऱ्यांची आकडेवारी पाहता इथं सुरत गँग आणि यूपी गँग या दोन टोळ्या कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

======================================================

VIDEO : धनंजय मुंडेंच्या गणेश महोत्सवात सपना चौधरीचे ठुमके

First published: September 18, 2018, 6:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading