Home /News /mumbai /

मुंबईकरांना लालबागचं दर्शन घेता येणार का? गणेश मंडळे अन् पोलिसांच्या बैठकीत मोठा निर्णय

मुंबईकरांना लालबागचं दर्शन घेता येणार का? गणेश मंडळे अन् पोलिसांच्या बैठकीत मोठा निर्णय

सलग दुसऱ्या वर्षीही गणेशोत्सवावर कोरोना विषाणूचं सावट आहे. दरम्यान मुंबईतील गणेश भक्तांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.

सलग दुसऱ्या वर्षीही गणेशोत्सवावर कोरोना विषाणूचं सावट आहे. दरम्यान मुंबईतील गणेश भक्तांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.

सलग दुसऱ्या वर्षीही गणेशोत्सवावर कोरोना विषाणूचं सावट आहे. दरम्यान मुंबईतील गणेश भक्तांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.

    मुंबई, 06  सप्टेंबर: सलग दुसऱ्या वर्षीही गणेशोत्सवावर कोरोना विषाणूचं सावट आहे. दरम्यान मुंबईतील गणेश भक्तांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. कोरोना संसर्गाच्या काळातही मुंबईतील गणेश भक्तांना लालबागमधील सार्वजनिक मंडळांच्या गणपतीचं दर्शन घेता येणार आहे. पण त्यासाठी संबंधित ठिकाणी जाऊन गर्दी करण्याची गरज नाही. कारण यावर्षी लालबागमधील गणपतीचं ऑनलाइन दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मुंबई पोलीस आणि लालबागमधील गणेश मंडळांमध्ये नुकतीच याबाबतची बैठक पार पडली असून यामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर, राज्यात कोरोना स्थिती आटोक्यात आली असली तरी देशात कोरोना विषाणूची तिसरी लाट येण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे. अशा पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात कोरोना नियमांचं उल्लंघन होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून तातडीची पावलं उचलली जात आहेत. तसेच गणेश मंडळाशी चर्चा करून भाविकांची गर्दी रोखण्यासाठी काय करता येईल, यावर उपाय शोधले जात आहेत. तसेच भाविकांची गर्दी टाळण्यासाठी लहान आकाराचे गणपती बसवण्याचं आवाहन केलं जात आहे. हेही वाचा-LIVE: आपल्याला तिसरी लाट येऊच द्यायची नाही - मुख्यमंत्री खरंतर, गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील लालबागचा गणपती पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक दरवर्षी गर्दी करत असतात. लालबागमध्ये गणेशगल्ली, लालबागचा राजा, रंगारी बदक, चिंचपोकळीचा चिंतामणी अशी अनेक मोठी गणेशमंडळं आहेत. ही मंडळे गणेशाच्या उंच मूर्ती बसवतात. त्यामुळे गणेश भाविकांसाठी लालबाग हे आकर्षणाचं ठिकाण ठरतं. परिणामी लोकं मोठ्या संख्येनं गणपती पाहण्यासाठी गर्दी करतात. कोरोना प्रादुर्भाच्या काळात अशी गर्दी टाळण्यासाठी चार फुटांपर्यंतची गणेश मूर्ती बसवण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. हेही वाचा-..मग शिवाजी महाराजांना अटक केली असती? राऊतांच्या वादग्रस्त विधानानंतर BJP आक्रमक लालबागमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता कोणत्याही मंडळाचं दर्शन बाहेरुन येणाऱ्या गणेशभक्तांना घेता येणार नाही. मात्र तेथील रहिवासी आणि स्थानिकांना हे दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांकडून गणेशभक्तांसाठी ऑनलाइन दर्शनाची सोय करण्यात येणार आहे. पोलीस आणि सार्वजनिक मंडळांमध्ये नुकतीच याबाबतची बैठक पार पडली आहे. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona spread, Mumbai

    पुढील बातम्या