ज्वेलरी दुकानात चोरी करणाऱ्या महिलेला अटक, चोरी सीसीटीव्हीत कैद

ज्वेलरी दुकानात चोरी करणाऱ्या महिलेला अटक, चोरी सीसीटीव्हीत कैद

कल्याण पूर्वमधल्या एका दागिन्यांच्या दुकानात ही महिला गेली. दागिने बघण्याचं सोंग करत तिनं एक सोन्याचं लॉकेट आपल्या खिशात टाकलं.

  • Share this:

10 डिसेंबर : ज्वेलरी दुकानात जाऊन चोरी करणाऱ्या एका महिलेला कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी अटक केलीये. कल्याण पूर्वमधल्या एका दागिन्यांच्या दुकानात ही महिला गेली. दागिने बघण्याचं सोंग करत तिनं एक सोन्याचं लॉकेट आपल्या खिशात टाकलं. त्यानंतर लगेचच तिनं हे लॉकेट तिच्या मोबाईल कव्हरमध्ये लपवलं. लॉकेट सापडत नसल्याचं दुकानदाराच्या लक्षात आलं. त्यानं जाब विचारल्यावर महिलेनं आपला काहीही संबंध नसल्याचं सांगितलं.

पोलिसांना बोलावल्यावर पोलीस महिलेला ठाण्यात घेऊन गेले. तिथे एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं तिची झडती घेतली. पण काहीच सापडलं नाही. शेवटी, मोबाईलचं कव्हर काढल्यावर त्यात लॉकेट सापडलं. पोलिसांनी तिला अटक करून तिच्या विरोधात गुन्हे दाखल केलेत.

First published: December 10, 2017, 12:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading