मुंबई, 19 डिसेंबर : मुंबईत मित्रांसोबत तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. या प्रकरणी कुर्ला नेहरूनगर पोलिसांनी बर्थडे बॉयसह त्याच्या सहा मित्रांना अटक केली आहे.
पोलिसांनी बर्थडे बॉयच्या घरी जाऊन विनापरवाना शस्त्र बाळगल्या तलवार जप्त केली. तसंच त्याच्यावर कोरोना काळात असलेल्या नियमांची पायमल्ली केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. कुर्ल्याच्या अलिदादा इस्टेट या ठिकाणी राहत असलेल्या समिरुद्दीन जमिरुद्दीन अन्सारी वय 20 वर्षे याचा आज 19 डिसेंबरला वाढदिवस होता.
शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजता समिरुद्दीन याने आपले मित्र मोहंमद असिफ समीउल्हा इद्रिसी वय 19 वर्षे, तौफिक रफिक शेख, वय 22 वर्षे, शेरअली सजाद अली इद्रिसी,वय 17वर्षे, अरबाज आयुब शेख, वय 23वर्षे, मिसम अब्बास आश्रफ हुसेन सय्यद, वय 19 वर्षे, अमान तन्वीर शेख,वय 19 वर्षे यांच्या समवेत तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला.
या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सुद्धा काढण्यात आला होता आणि तो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर नेहरूनगर पोलिसांनी कारवाही करत 7 जणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणलं. तसंच त्यांना अटक करण्यात आली. यातील अल्पवयीन सजाद अली इद्रिसी,वय 17वर्षे यास समज देऊन त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.