कमाल! पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एका Facebook ग्रूपने जमा केला 9 लाखांचा निधी

केवळ निधीच नव्हे तर औषधी, कपडे ,अन्नधान्यही मोठ्या प्रमाणावर जमा केलं असून जमा झालेल्या निधीतून एक गाव किंवा वाडी दत्तक घेऊन त्याचं पूर्ण पुनर्वसन करण्याचा संकल्प या समुहाने सोडलाय.

News18 Lokmat | Updated On: Aug 15, 2019 07:22 PM IST

कमाल! पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एका Facebook ग्रूपने जमा केला 9 लाखांचा निधी

सागर कुलकर्णी, मुंबई 15 ऑगस्ट : कोल्हापूर, सांगलीसह अनेक भागात आलेल्या पूर संकटात मदतीसाठी हजारो हात सरसावले असतानाच आभासी जग म्हणून ओळखलं जाणारं फेसबुकही आता यात पाठीमागे राहिलं नाही. फेसबुकवरच्या कुबेर या समुहाने तब्बल 9 लाख रुपयांचा निधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जमा केलाय. केवळ निधीच नव्हे तर औषधी, कपडे ,अन्नधान्यही मोठ्या प्रमाणावर जमा केलं असून जमा झालेल्या निधीतून एक गाव किंवा वाडी दत्तक घेऊन त्याचं पूर्ण पुनर्वसन करण्याचा संकल्प या समुहाने सोडलाय.

संगमनेर येथील बांधकाम व्यवसायिक संतोष लहामगे यांनी पाच वर्षांपूर्वी फेसबुक वर कुबेर या नावाने एक ग्रुप तयार केला. महाराष्ट्रासह अनेक राज्यात व देश-विदेशात सतराशे सदस्य असलेल्या या ग्रुपने सुरुवातीला सदस्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलं.

पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसणात गेले होते का? सदाभाऊंचा हल्लाबोल

मात्र मागील काही काळापासून या समूहाने सामाजिक कार्यातही उडी घेतली असून याच सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून कोल्हापूर, सांगलीसह आणि ठिकाणी आलेल्या पुराच्या संकटात मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेतला. या समुहाने केलेल्या आवाहनानुसार समूहातील सदस्यांनी अवघ्या चारच दिवसात तब्बल 9 लाख रुपयांचा निधी जमा केला आहे. यात 4 रुपयापासून ते 50 हजार रुपयापर्यंत व्यक्तिगत मदत सदस्य करत आहेत. याशिवाय कपडे, औषधी आणि अन्नधान्य मोठ्या प्रमाणावर जमा करून ते पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठवले आहे .

बिबट्या मादी आणि तिच्या पिलाच्या भेटीचा चटका लावणारा VIDEO तुम्ही पाहिलाच पाहिजे

Loading...

पुराची परिस्थिती संपूर्णपणे ओसरल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने एखादे गाव किंवा वाडी दत्तक घेऊन त्याचे संपूर्णपणे पुनर्वसन करण्यासाठी या निधीचा उपयोग करण्यात येणार असल्याचे समूहाचे संस्थापक संतोष लहामगे यांनी सांगितले. समुहात जमा होणारा निधी जमा करण्यासाठी कुबेर फाउंडेशन नावाची रजिस्टर संस्थाही स्थापन करण्यात आली आहे .

यापूर्वीही समूहाने दुष्काळाच्या काळात उस्मानाबाद जिल्ह्यातील राजूर येथे जलसंधारणाचे काम हाती घेतले होते, दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा, अनाथाश्रमातील मुलींसाठी स्वच्छतागृह, अपंगांना साहित्याचे वाटप , दिवाळी अंकाचे प्रकाशन , गरजूंना आर्थिक मदत, समूहातील सदस्यांना आर्थिक वैद्यकीय मदत, रक्तदान शिबिरे अनाथाश्रमातील मुलांना साहित्य वाटप, मुंबईच्या दादर चौपाटी चे गणेश विसर्जनानंतर स्वच्छता अभियान, फिरते वाचनालय, ग्रंथ दिंडी , रामशेज किल्ला स्वच्छता मोहीम, वॉटर कप स्पर्धेत श्रमदान सह जवळपास 48 उपक्रम समूहाने मागील दोन वर्षात राबवले आहेत. या उपक्रमात ज्यांना मदत करायची असेल त्यांनी 99221- 11666, 98348- 32140 , 9822532808 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अबब...रक्षाबंधानासाठीच्या या 'गोल्डन' मिठाईचा भाव ऐकला तर तुम्ही चाटच पडाल!

औषधे केली एअर लिफ्ट

पुराच्या काळात एका गावात औषधें पुरवणे आवश्यक होते, मात्र गावात जाण्यासाठी कोणताच मार्ग नव्हता, त्यावेळी समूहाने कोल्हापूर विमानतळावर औषधें उपलब्ध करून देत ती औषधें त्या संबंधित गावात एअर लिफ्ट करून मदत पोहचवली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 15, 2019 07:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...