मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /दीड वर्षांपूर्वी काँग्रेस सोडलेल्या ‘या’ नेत्याचा उद्या भाजप प्रवेश, मुंबईत वाढणार भाजपची ताकद

दीड वर्षांपूर्वी काँग्रेस सोडलेल्या ‘या’ नेत्याचा उद्या भाजप प्रवेश, मुंबईत वाढणार भाजपची ताकद

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी गृहराज्य मंत्री कृपाशंकर सिंह हे बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी गृहराज्य मंत्री कृपाशंकर सिंह हे बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी गृहराज्य मंत्री कृपाशंकर सिंह हे बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

मुंबई, 6 जुलै : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी गृहराज्य मंत्री कृपाशंकर सिंह (Krupa Shankar Singh) हे बुधवारी भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फढणवीस (Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीत बुधवारी दुपारी 12 वाजता त्यांचा अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. या प्रवेशामुळे भाजपची मुंबईतील ताकद वाढायला मदत होणार आहे. त्याचप्रमाणं नाशिकमधील युवा नेते यतीन रावसाहेब कदम (Yatin Kadam) हेदेखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

कृपाशंकर सिंह यांनी सुमारे 20 महिन्यांपूर्वी म्हणजेच 10 सप्टेंबर 2019 या दिवशी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत राजीनामा दिला होता. केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यावर काँग्रेसनं त्याला केलेला विरोध मान्य नसल्याचं सांगत त्यांनी बाहेरची वाट धरली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा निर्णय़ अत्यंत योग्य असल्याचं सांगत कृपाशंकर सिंह यांनी भाजप प्रवेशाचेही संकेत दिले होते. मात्र आतापर्यंत ते कुठल्याच पक्षाचे सभासद नव्हते.

कृपाशंकर यांची कारकीर्द

कृपाशंकर सिंह हे काँग्रेसच्या तिकीटावर कलीना विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ते गृह राज्यमंत्री होते. काँग्रेसचा उत्तर भारतीय चेहरा ही कृपाशंकर यांची मुख्य ओळख होती. विलासराव देशमुखांचे विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून कृपाशंकर यांची विशेष ख्याती त्या काळात होती. तर यतीन रावसाहेब कदम हे सध्या नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. नाशिकच्या निफाडचे दिवंगत आमदार रावसाहेब कदम यांचे ते पुत्र आहेत.

हे वाचा -राज्यातील जाहीर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता

भाजपची मुंबईतील ताकद वाढणार

12 आमदारांच्या निलंबनाने भाजपला मुंबईत मोठा झटका बसेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विधानसभेत निलंबित झालेले बहुतांश आमदार हे मुंबईचेच असल्याचं चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर कृपाशंकर सिंह यांचा भाजप प्रवेश ही पक्षासाठी एक प्रकारचे संजीवनी ठरणार असून उत्तर भारतीय मतांची बेगमी करण्यासाठी भाजपला याचा मोठा फायदा होऊ शकतो.

First published:
top videos

    Tags: BJP, Mumbai