Home /News /mumbai /

आदित्य ठाकरे ठाकरे न्याय द्या, नाही तर जलसमाधी घेणार; 'कोलाड'करांची पर्यटनमंत्र्यांना साद

आदित्य ठाकरे ठाकरे न्याय द्या, नाही तर जलसमाधी घेणार; 'कोलाड'करांची पर्यटनमंत्र्यांना साद

पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्याएवजी वसुलीच्या नावाने लघु पाटबंधारे विभागामार्फत कुंडलीका नदी क्षेत्रात केल्या जाणाऱ्या या कारवाईमुळे येथील व्यवसाईक आणि पर्यटक धास्तावले आहेत.

मोहन जाधव, रायगड 22 जानेवारी : आदित्य ठाकरे यांनी पर्यटनमंत्रालयाचा कारभार स्वीकारल्यापासून राज्यात नव्या योजनांचा पुरस्कार केलाय. पर्यटन वाढिसाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. महाराष्ट्रात पर्यटनाला मोठ्या संधी आहेत असंही त्यांनी जाहीर केलं. पर्यटनमंत्री पर्यटनासाठी प्रयत्न करत असतानाच अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे रायगडमधील कुंडलीका नदीमध्ये सुरू असलेली रिव्हर राफ्टींग बंद पडलंय. अधिकाऱ्यांचं असंच धोरण राहिलं तर शेकडो जणांवर बेरोजगारीचं संकट ओढवणार असून रायगड जिल्ह्यातल्या पर्यटनाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नदीच्या पाण्यात जोरदार प्रवाहासोबत वाहत जात थ्रील अनुभवणाऱ्या पर्यटकांच्या तोंडावर कोलाड हे नाव आपसुक येतं. कारण रिव्हर राफ्टींगसाठी रायगड जिल्ह्यातील कोलाड आता सर्वश्रृत झालं आहे. पण आता हे थ्रिल अनुभवणाऱ्या हौशी पर्यटकांसाठी थोडी दु:खाची बातमी आहे. कोलडच्या कुंडलीका नदीत होणारी हि रिव्हर राफ्टींग शासनाच्या लघु पाटबंधारे विभागाने बंद केलं आहे. लघु पाटबंधारे विभागाच्या वसुलीच्या चुकीच्या धोरणाचा फटका रिव्हर राफ्टींग व्यवसायाला बसला असुन पुढे येणाऱ्या ऑनलाईन टेंडर पध्दत आणि कोट्यावधीच्या डिपॉझिटमुळे स्थानिक व्यवसायीक हद्दपार होणार या बेरोजगारीच्या भितीने येथील व्यवसायीक धास्तावले आहेत.

आर्थिक राजधानी आहे रानटी जनावरांचं शहर, तुम्ही कल्पनाही नाही करणार अशी मुंबईची '

गड किल्ले, विस्तीर्ण समुद्र किनार हि रायगड जिल्ह्याची नैसर्गिक ओळख आहे. पण टाटा पॉवरच्या मुळशी धरणातुन कुंडलीका नदीला सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा वापर करीत येथील स्थानिकांनी 20 वर्षांपुर्वी रिव्हर राफ्टींगचा व्यवसाय सुरू केला. नदीची रेकी करण्यापासुन ते पर्यटकांना आकर्षित करणे, सोईसुविधा देण्याचे काम करीत स्थानिक बेरोजगार तरुणांनी कोलाड राफ्टींग या नावाने हा व्यवसाय विकसित करीत शासनाला कोट्यावधीचा महसुल दिला. मात्र आज मुदत असतानाही वसुलीचा तगादा लावत लघु पाटबंधारे विभागाच्या कोलाड शाखेने राफ्टींग व्यवसाय बंद केल्याने येथील व्यवसायीक धास्तावले आहेत.

महाअधिवेशनाच्या आधी मनसे नेत्याची उद्धव ठाकरेंवर विखारी टीका

गेली 20 वर्षे राफ्टींग व्यवसायात घालवल्यानंतर बाहेर पडण्याची वेळ आल्याने ज्या कुंडली का नदीच्या कुशीत व्यवसाय केला त्याच नदीच्या कुषीत जलसमाधी घ्यावी लागेल असा इशारा राफ्टींग व्यवसायीक प्रकाश मोरे यांनी दिलाय. शासन रायगडमध्ये पर्यटन व्यवसाय विकसित करण्यासाठी प्रयत्नशिल आहे. पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्याएवजी वसुलीच्या नावाने लघु पाटबंधारे विभागामार्फत कुंडलीका नदी क्षेत्रात केल्या जाणाऱ्या या कारवाईमुळे येथील व्यवसाईक आणि पर्यटक धास्तावले आहेत त्यामुळे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी यात लक्ष घालून पर्यटनाला खिळ घालणाऱ्या अधिकाऱ्यांना समज द्यावी अशी मागणी स्थानिक राफ्टींग व्यवसायीक महेश सानप यांनी केली आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:Ajay Kautikwar
First published:

पुढील बातम्या