कोकण विकास मंचच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असूनसुद्धा प्रशासन जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 28, 2017 11:58 PM IST

कोकण विकास मंचच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

28 आॅक्टोबर : विविध मागण्यांसाठी कोकण विकास मंचच्या वतीने गुरुवारपासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोकण विकास मंचचे संचालक निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असूनसुद्धा प्रशासन जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेला आणि सुरू असलेला भ्रष्टाचार, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभाजन करुन पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निर्मिती करणे, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील विद्यमान दोन संचालकांचे निधन झाल्याने रिक्त पदांची निवडणूक घ्यावी, अवकाळी पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा, मनोर-वाडा-भिवंडी रस्त्याच्या अपूर्ण आणि निकृष्ट कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, चिंचोटी-कामण-अंजूर-माणकोली या निकृष्ट कामातील भ्रष्टाचाराबाची चौकशी करावी तसंच लवकरात लवकर ठाणे-पालघर जिह्यातील जनतेच्या विकासाच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करावी या प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी कोकण विकास मंचच्यावतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरु आहे.

4 ऑगस्ट 2017 रोजी वरिल प्रलंबित प्रश्नांसाठी ठाणे आणि पालघर जिह्यातील सुमारे 25000 जनतेने मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले होते. मात्र अद्याप हे प्रश्न न सुटल्याने आमरण उपोषण आणि आंदोलन करण्यात येत असल्याचे कोकण विकास मंचचे संचालक निलेश सांबरे यांनी यावेळी सांगितलंय.

शुक्रवारी 27 तारखेला शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयापासुन ठाणे शहरात कँडल मार्च काढण्यात आला. दिवसेंदिवस आंदोलनाला नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. पालघर, जव्हार, विक्रमगड, वाडा, भिवंडी, शहापुर, ठाणे मधून रोज रोज शेकडो नागरिक उपोषणस्थळी भेट देत आहेत.

या आमरण उपोषण आंदोलनाला ठाणे आणि पालघर जिह्यातील भिवंडी, वाडा, विक्रमगड, भिवंडी, शहापूर आणि पालघर तालुक्यातील 3 71 ग्रामपंचायती, 39 सेवा सहकारी सोसायटी,खासदार अॅड. चिंतामण वनगा, आमदार रविंद्र फाटक, आमदार शांताराम मोरे, आमदार पास्कल धनारे,शिवसेना उपनेते अनंत तरे, ठाणे मनपातील नगरसेवक नरेंद्र सुरकर आणि ठाणे - पालघर जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी पाठिंबा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2017 02:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...