कोकणात मुसळधार पाऊस, पुरामुळे जनजीवन विस्कळीत

कोकणात मुसळधार पाऊस, पुरामुळे जनजीवन विस्कळीत

कोकणात दोन मुसळधार पाऊस सुरुच आहे आजच्या सलग तिस-या दिवशीही पावसाची संततधार सुरुच आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्याला पावसाने शब्दशः झोडपून काढलंय.

  • Share this:

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, 19 सप्टेंबर : कोकणात दोन मुसळधार पाऊस सुरुच आहे आजच्या सलग तिस-या दिवशीही पावसाची संततधार सुरुच आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्याला पावसाने शब्दशः झोडपून काढलंय. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं 48 तासात कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा कुलाबा वेधशाळेनं दिलाय. रत्नागिरी, खेड, चिपळूण, लांजा या तालुक्यांमध्ये पावसाचा सर्वाधिक जोर आहे.

दापोलीतही धोधो पाऊस कोसळतोय. त्यामुळे तितल्या प्राथमिक शाळा बंद ठेवण्यात आल्यात. नद्याही दुथडी भरुन वाहताय. काही ठिकाणी तर नद्यांनी धोक्याची पातळीही ओलांडलीय. हर्णे बंदरात वादळ झाल्याने मच्छीमारीसाठी गेलेल्या 900 नौका परतल्यायत. या नौकांनी सुवर्णदुर्ग आणि आंजर्ले खाडीचा आधार घेतलाय.

पुढच्या 48 तासातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. सिंधुदुर्गातही गेले दोन दिवस पाऊस थांबत नसल्याने काही नद्यांना पूर आलाय. कुडाळमधल्या आंबेरी पुलावर पुराचं पाणी चढलंय. त्यामुळे बारा खेड्यांचा कुडाळशी संपर्क तुटलाय. तसंच मसुरे, कावा, काळसे या भागातही पुराचं पाणी भरलंय. थोडावेळ उसंत घेऊन पाऊस पुन्हा सुरु होत असल्यामुळे पुढचे चोवीस तास नागरिकांना सतर्क राहाण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय.

रायगड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने प्रशासनाने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्यात.

First published: September 19, 2017, 2:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading