कोकण मार्गावर धावणाऱ्या या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

कोकण मार्गावर धावणाऱ्या या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

मुंबई-करमाळी तेजस एक्स्प्रेस आणि दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 1 डिसेंबर - कोकण मार्गावर धावणाऱ्या गाड्याचे वेळापत्रकामध्ये रविवार, 2 डिसेंबर ते 2 जानेवारी 2019 पर्यंत बदल करण्यात आला आहे. मुंबई-करमाळी तेजस एक्स्प्रेस आणि दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे.

तेजस एक्स्प्रेस (गाडी क्र. २२११९) ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पहाटे ५ ऐवजी पहाटे ५.५० वाजता सुटेल. ही गाडी नवीन वेळेनुसार दादर येथे सकाळी ६ वाजता, ठाण्यात स. ६.२५ वा., पनवेल येथे स. ७ वा. आणि करमाळीस पूर्वीच्या दु. १.२० ऐवजी २ वाजता पोहोचेल. परतीच्या मार्गावर ही गाडी करमाळीहून पूर्वीच्या दु. २.३० ऐवजी दु. २.४० वाजता सुटेल. ही गाडी पनवेलला रा. ९.४५ वा., ठाण्यात १०.३० वा., दादरला रा. १०.५० वा., सीएसएमटी येथे रा. ११.१५ वाजता पोहोचेल.

तर, जनशताब्दी एक्स्प्रेस (गाडी क्र. १२०५१) ही सध्याच्याच वेळेनुसार पहाटे ५.२५ वाजता सुटून मडगाव येथे दु. २.०५ वाजता पोहोचेल. परतीच्या मार्गावर ही एक्स्प्रेस मडगावहून दु. २.३० ऐवजी दु. २.४० वा. सुटून पनवेलमध्ये रा. १०.०५ वा., ठाण्यात रा. १०.५० वा., दादरमध्ये रा. ११.१५ वाजता पोहोचेल.

 VIDEO : दुष्काळाचं दुष्टचक्र : आता या गावात उरली आहेत फक्त वृद्ध मंडळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2018 08:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading