Home /News /mumbai /

किशोरी पेडणेकरांनी केली चित्रा वाघ यांची बोलती बंद, गुजरातमध्ये जाऊन विचारली पेंग्विनची नाव!

किशोरी पेडणेकरांनी केली चित्रा वाघ यांची बोलती बंद, गुजरातमध्ये जाऊन विचारली पेंग्विनची नाव!

राणीच्या बागेतील पेंग्विनच्या (penguin in rani baug mumbai ) नामकरणावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटला होता.

राणीच्या बागेतील पेंग्विनच्या (penguin in rani baug mumbai ) नामकरणावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटला होता.

राणीच्या बागेतील पेंग्विनच्या (penguin in rani baug mumbai ) नामकरणावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटला होता.

      मुंबई, 29 जानेवारी : मुंबईतल्या राणीच्या बागेतील पेंग्विनच्या (penguin in rani baug mumbai ) नामकरणावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटला होता. आज शिवसेनेच्या नेत्या आणि महापौर किशोरीताई पेडणेकर (Kishori Pednekar ) या गुजरातमध्ये पोहोचल्या. अहमदाबादमधील पेंग्विन पार्कची (Penguin Park in Ahmedabad,) पाहणी केली आणि तिथल्या पेंग्विनला काय नाव दिली, याची विचारणाच केली. गुजरात दौऱ्याच्या निमित्ताने पेडणेकर यांनी एकाप्रकारे भाजपच्या नेत्यांची बोलतीच बंद केली. महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज गुजरातचा दौरा कला. विशेष म्हणजे, अहमदाबादमधील पेंग्विन पार्कची पाहणी पेडणेकर यांनी केली.  यावेळी पेडणेकर यांनी आवर्जुन पेंग्विनला नाव काय दिली, याची विचारणा केली. या ठिकाणी एकूण ५ अफ्रिकन पेंग्विन आहेत. त्यांची नावं सिमोन, पुंबा, नेमो, मुशू आणि स्वेन अशी ठेवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच गुजरातचे शिक्षण मंत्री जितूभाई वघाणी यांनी अहमदाबादमधील या पार्कचं उद्घाटन केलं होतं. या पेंग्विन प्रदर्शनासाठी एकूण २६४ कोटी रुपयांचा खर्च आला आहे.  या ठिकाणी एकूण ५ आफ्रिकन पेंग्विन आहेत. त्यांची नावं सिमोन, पुंबा, नेमो, मुशू आणि स्वेन अशी आहेत.गुजरात सरकार आधी ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडमधून पेंग्विन आणण्याचा विचार करत होतं. मात्र, अखेर अफ्रिकन पेंग्विन आणण्याचा निर्णय घेण्यात आला. (विराटच्या चाहत्यांना मिळणार गुड न्यूज? किंग कोहली पुन्हा होणार Captain!) विशेष म्हणजे, मध्यतंरी, मुंबईतल्या राणीच्या बागेतील पेंग्विनच्या नामकरणावरून वाद निर्माण झाला होता. महापौर किशोरी पेडणेकर विरुद्ध भाजप नेत्या चित्रा वाघ आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाला होता. 'गुजरातमध्ये पेंग्विनवर झालेले २६४ कोटी रुपये आणि मुंबईत पेंग्विनवर झालेले १७ कोटी रुपये खर्च यावरून कुठे पाणी मुरतंय हे जनतेला कळतंय. त्यामुळे आता राणीच्या बागेत येणाऱ्या हत्तीच्या पिल्लाला चंपा आणि माकडाच्या पिल्लाला चिवा नाव देणार, असा टोलाच किशोरीताई पेडणेकरांनी चित्रा वाघ यांना लगावला.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या