Home /News /mumbai /

आशिष शेलार, भातखळकर आजपासून ‘गुजरात पेंग्विन’, अहमदाबाद दौऱ्यानंतर मुंबई महापौरांकडून भाजपचा समाचार

आशिष शेलार, भातखळकर आजपासून ‘गुजरात पेंग्विन’, अहमदाबाद दौऱ्यानंतर मुंबई महापौरांकडून भाजपचा समाचार

मुंबईत पेंग्विन आणल्यावर टीका करणाऱ्या भाजप नेते आशिष शेलार आणि अतुल भातखळकर यांना आता ‘गुजरात पेंग्विन’ म्हणायचं का, असा सवाल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

    मुंबई, 31 जानेवारी: मुंबईत (Mumbai) पेंग्विन (Penguin) आणल्यानंतर आदित्य ठाकरेंवर (Aditya Thakray) टीका करणाऱ्या आशिष शेलार (Ashish Shelar) आणि अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यासारख्या नेत्यांना आता ‘गुजरात पेंग्विन’ (Gujrat Penguin) म्हणायचं का, असा सवाल मुंबईच्या महापौर (Mumbai Mayor) किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केला आहे. गुजरात दौऱ्यावरून परत आलेल्या महापौरांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका केली आहे. गुजरातमधील पेंग्विन प्रकल्पाचं स्वागत करत असताना महाराष्ट्रातील नेत्यांवर मात्र त्यांनी आसूड ओढले आहेत. अहमदाबादमध्ये जंगी स्वागत अहमदाबादमध्ये जाऊन तिथल्या पेंग्विनची आपण पाहणी करून आल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. तिथले महापौर आणि उपमहापौर यांनी आपलं जोरदार स्वागत केलं. जलेबी फाफडा, किशोरी पेडणेकर आपडा, या प्रकारचं स्वागत आपल्याला आवडलं असल्याचा अनुभव त्यांनी व्यक्त केला. आपण स्वखर्चाने अहमदाबादला गेलो होतो. कुणाशीही आपण तुलना केली नव्हती, तरीही इथे अनेकांना उलट्यांचा त्रास सुरू झाला, अशी टीका त्यांनी केली.  गुजरातपेक्षा मुंबईच ‘भारी’ मुंबईत आदित्य ठाकरे यांनी सर्वप्रथम कल्पना मांडली आणि पेंग्विन आणले. मुंबई ही सगळ्यात छान असून विकासासाठी पुढं असल्याचं त्या म्हणाल्या.  परदेशात अशा प्रकारच्या उद्यानांना भेट देण्यासाठी 1000 रुपयांपेक्षा अधिक खर्च येतो. मात्र मुंबईत 100 रुपयांमध्ये पूर्ण कुटुंबाला राणीची बाग पाहता येते, असं त्या म्हणाल्या. गुजरामध्ये यासाठी 264 कोटी रुपये खर्च झाले. आपल्याकडे पेंग्विनसाठी 24 तास डॉक्टर उपलब्ध असतात, गुजरातमध्ये एकही डॉक्टर नाही. अफ्रिकन पेंग्विनसाठी 50 मिमी जाडीची काच बसवण्यात आली आहे. आपले पेंग्विन गुजरातच्या तुलनेत मोठे आहेत. आपल्याकडे 17.5 कोटीत पेंग्विन कक्ष उभारण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत आणलेल्या पेंग्विनपैकी एक दगावला होता. गुजरातमध्येही 6 पेंग्विन होते, मात्र त्यातील एक कुठे गेला, हे माहित नसल्याचं त्यांनी सांगितलं.  शेलार, भातखळकर ‘गुजरात पेंग्विन’ गुजरातमध्ये पेंग्विन कक्ष उभारून चांगलं काम सुरू असल्याचं माहित असल्यामुळे विरोधी पक्ष गप्प आहेत. मात्र आपल्याकडे विरोधी पक्ष वाटेल ती टीका का करतात, असा सवाल त्यांनी केला. आता गुजरातमध्ये हाच प्रयोग झाल्यावर त्यावरून टीका करणाऱ्या आशिष शेलार आणि अतुल भातखळकर यांना आजपासून ‘गुजरात पेंग्विन’ म्हणायचं का, असा सवाल त्यांनी केला. आशिष शेलार यांना माझ्याशी थेट चर्चा करायची असेल, तर माझी तयारी आहे. मात्र त्याअगोदर त्यांनी माझीच नव्हे, तर संपूर्ण महिला वर्गाची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.  गुजरातच्या भ्रष्टाचारावर बोला गुजरातमध्ये भ्रष्टाचार झाला नाही का, असा सवाल करत पुरावे न देता नुसतेच आरोप करत सुटण्याबद्दल त्यांनी भाजपवर टीका केली. कुठलेही पुरावे नसताना उगाच मोघम आरोप करायचे आणि एकही सिद्ध करायचा नाही, असा प्रकार भाजप नेते करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आपला गुजरातवर किंवा अहमदाबादच्या नेत्यांवर बिलकूल राग नसून आपल्याकडे महादेव देवळे हे जसे साधे महापौर होते, तसेच तिकडचे महापौर साधे आहेत, असा दावा त्यांनी केला.  हे वाचा - आघाडी सरकारचं काम चांगलं महाराष्ट्रातलं आघाडी सरकार चांगलं काम करत असल्याचं सांगत त्यांनी निवडणूक आयोग आणि राज्य सरकार जो निर्णय घेईल, त्याचं आपण स्वागत करू, असं त्या म्हणाल्या. राज्य पातळीवरील यंत्रणा जो काही निर्णय घेईल, त्याचं मुंबईची महापौर म्हणून मी स्वागतच करेन, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Ashish shelar, Gujrat, Kishori pedanekar, Mumbai Mayor

    पुढील बातम्या