Home /News /mumbai /

'मुंबई पोलिसांनी खोटा FIR नोंदवला', आयुक्तांविरोधात किरीट सोमय्या हायकोर्टाचा दरवाजा ठोठावणार

'मुंबई पोलिसांनी खोटा FIR नोंदवला', आयुक्तांविरोधात किरीट सोमय्या हायकोर्टाचा दरवाजा ठोठावणार

'मुंबई पोलिसांनी खोटा FIR नोंदवला', आयुक्तांविरोधात सोमय्या हायकोर्टाचा दरवाजा ठोठावणार

'मुंबई पोलिसांनी खोटा FIR नोंदवला', आयुक्तांविरोधात सोमय्या हायकोर्टाचा दरवाजा ठोठावणार

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक झाल्यावर खार पोलीस स्टेशनला गेलेल्या किरीट सोमय्या यांच्यावर पोलीस स्टेशनच्या परिसरात जमावाने हल्ला केला होता.

मुंबई, 28 एप्रिल : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर खार पोलीस स्टेशनच्या (Khar Police Station) परिसरात जमावाने हल्ला केला. सोमय्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यात त्यांना दुखापत सुद्धा झाली होती. या हल्ल्यानंतर पोलीस आपला एफआयआर घेत नसल्याचं म्हणत सोमय्यांनी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या दिला. त्यानंतर सोमय्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला. आपला एफआयआर पोलिसांनी घेतलाच नाही. उलट आपल्या नावाने बनावट एफआयआर दाखल केल्याचा खळबळजनक आरोप सोमय्यांनी केला. इतकेच नाही तर आपली बनावट सही सुद्धा केल्याचं त्यांनी म्हटलं. त्याच प्रकरणात सोमय्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली. त्यानंतर आता सोमय्या थेट हायकोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहेत. किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटलं, खार पोलीस स्टेशनच्या परिसरात झालेला हल्ला, पोलिसांनी नोंदवलेला खोटा एफआयार या संदर्भात मुंबई पोलीस आणि ठाकरे सरकारच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे. दुपारनंतर ही याचिका दाखल करण्यात येईल. वाचा : वैद्यकीय तपासणीचा अहवाला आला समोर, किरीट सोमय्यांच्या दुखापतीबाबत मोठी माहिती उघड दोन दिवसांपूर्वी किरीट सोमय्या म्हणाले होते, ज्या पद्धतीने याच ठिकाणी मुंबई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली 70-80 शिवसेनेच्या गुंडांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला होता. ते प्रकरण दाबण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या आदेशाने वांद्रे पोलिसांनी एक बनावट एफआयआर तयार केली. ती एफआयआर खार पोलिसांना पाठवली. ही एफआयआर कॉपी मीडियाला दिली गेली. त्या बनावट एफआयआरच्या आधारे संजय पांडे यांनी कारवाई सुरू केली. आयपीएसी 154 अंतर्गत एफआयआरवर किरीट सोमय्याची सही असायला हवी. हे मुंबई पोलीस आयुक्तांना माहिती नाहीये का? सही नसताना मुंबई पोलिसांनी एफआयआर रजिस्टर्ड केली आहे ते उद्धव ठाकरेंच्या गुंडांना वाचवण्यासाठी केली आहे. नेमकं काय घडलं होतं? किरीट सोमय्या 23 एप्रिल रोजी रात्री खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस स्टेशनला गेले होते. यावेळी किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. किरीट सोमय्या परत जात असताना खार पोलीस स्टेशनबाहेर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगड फेकल्याचे समोर आलं आहे. यापूर्वीही अशाप्रकारे त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून दगडफेक झाली आहे. सोमय्या यांच्या गाडीची काच फोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. किरीट सोमय्या या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर सोमय्या यांनीच आमच्या अंगावर गाडी चढवली होती. असा दावा शिवसैनिकांनी केला आहे. याआधीही पुण्यात किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला होता 5 फेब्रुवारी रोजी किरीट सोमय्या पुणे महापालिकेत पोहोचले होते. तेव्हा शिवसैनिकांनी त्यांना अडवले. त्यावेळी सोमय्या आणि किरीट सोमय्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती. सोमय्या पालिका कार्यालयात आले तेव्हा त्यांच्यात आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष बघायला मिळाला. शिवसेना कार्यकर्त्यांनी तिथे आंदोलन केलं. सोमय्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांकडून प्रचंड घोषणाबाजी झाली. विशेष म्हणजे. यावेळी धक्काबुक्की देखील झाली. सुरक्षा रक्षकांनी मोठ्या शिताफीने सोमय्या यांना सुरक्षितपणे गाडीत बसवलं आणि तिथून बाहेर काढलं. पण यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांचा रोष प्रचंड शिगेला पोहोचलेला बघायला मिळाला.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Kirit Somaiya, Mumbai high court, Mumbai police

पुढील बातम्या