मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

चंद्रकांत पटेल यांचा उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो सोमय्यांकडून ट्विट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

चंद्रकांत पटेल यांचा उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो सोमय्यांकडून ट्विट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

File Photo

File Photo

Kirit Somaiya tweet: भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पटेल हे एकत्र असल्याचं दिसून येत आहेत.

    मुंबई, 23 मार्च : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) हे ईडीच्या रडारवर आहेत. कालच ईडीकडून 'पुष्पक ग्रुप'ची (Pushpak Group) ठाण्यातील एक मालमत्ता जप्त करण्यात आली. श्रीधर पाटणकर यांच्या प्रकरणात एक नाव समोर आलं होतं आणि ते म्हणजे पुष्पक ग्रुपचं. हा पुष्पक ग्रुप महेश पटेल, चंद्रकांत पटेल आणि कुटुंबीयांच्या मालकीचा आहे. यापैकीच एक असलेल्या चंद्रकांत पटेल यांच्यासोबतचा उद्धव ठाकरेंचा एक फोटो भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट केला आहे. श्रीधर पाटणकर यांच्या प्रकरणात चंद्रकांत पटेल यांचं नाव समोर आलं होतं. आता याच चंद्रकांत पटेल यांच्या सोबतचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो किरीट सोमय्यांनी ट्विट केला आहे. हा फोटो कधीचा आहे हे माहिती नाहीये आणि याची सत्यता आम्ही पडताळलेली नाहीये. मात्र, श्रीधर पाटणकर यांच्या प्रकरणात ज्या चंद्रकांत पटेल यांचं नाव समोर आलं होतं त्या चंद्रकांत पटेल आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो किरीट सोमय्यांनी ट्विट केला आहे. किरीट सोमय्यांनी दावा केला आहे की, चंद्रकांत पटेल आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आहेत. चंद्रकांत पटेल हे सीए असल्याचं सांगितलं जात आहे. काही राजकीय नेत्यांचे आर्थिक व्यवहारही ते सांभाळत असल्याचं बोललं जात आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पटेल एकत्र असल्याचा फोटो किरीट सोमय्या यांनी ट्विट केला आहे. वाचा : श्रीधर पाटणकरांना ED देणार आणखी एक धक्का ? आता 'ही' मालमत्ता ईडीच्या रडारवर किरीट सोमय्या यांनी केलेल्या या ट्विटवर अद्याप मुख्यमंत्री कार्यालय किंवा शिवसेनेकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये मात्र, किरीट सोमय्या यांनी केलेले हे आरोप अत्यंत गंभीर आहेत. यावरुन आता राजकीय वातावरणही आणखी तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? मेसर्स पुष्पक बुलियन ही पुष्पक ग्रुपची एक कंपनी आहे. पुष्पक ग्रुप हा महेश पटेल, चंद्रकांत पटेल आणि कुटुंबीयांच्या मालकीचा आहे. या कंपनीची 6 कोटी 45 लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेत निलांबरी प्रोजेक्टमधल्या 11 फ्लॅट्सचा समावेश आहे. निलांबरी प्रोजेक्ट हा साईबाबा गृहनिर्माण प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा आहे. साईबाबा गृहनिर्माण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची आहे. पुष्पक ग्रुपने नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या शेल कंपनीच्या माध्यमातून पैसा पाटणकरांच्या कंपनीला दिला. मेसर्स हमसफर डिलर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून पैसे दिले. विनातारण 30 कोटी रुपये कर्ज दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Kirit Somaiya, Mumbai, Uddhav thackeray

    पुढील बातम्या