Home /News /mumbai /

Kirit Somaiya : मंत्रालय ही कोणाच्या बापाची मालकी नाही, मी सचिन वाझेच्या फाईली पाहिल्या : किरीट सोमय्या

Kirit Somaiya : मंत्रालय ही कोणाच्या बापाची मालकी नाही, मी सचिन वाझेच्या फाईली पाहिल्या : किरीट सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्या

"मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे. मुख्यमंत्री माफी मागा. लिपिक परीवाराची माफी मागा. त्या फोटोत असं काय आहे? त्या फोटोसाठी तुम्ही किरीट सोमय्यांना नोटीस पाठवली की, दोन दिवसात एक्सप्लनेशन द्या. वा रे ठाकरे सरकार", असा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला.

पुढे वाचा ...
मुंबई, 27 जानेवारी : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Soamaiya) काही दिवसांपूर्वी मंत्रालयात (Mantralaya) गेले होते. त्यावेळी त्यांनी नगरविकास खात्याच्या विभागाला भेट दिली होती. यावेळी एका अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून ते फायली चाळत होते. याबद्दलचा फोटो सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) झाला आहे. विशेष म्हणजे, या फोटोमध्ये नगरविकास विभागाचे अधिकारी हे उभे असल्याचे दिसत आहे. संबंधित फोटो व्हायरल झाल्यानंतर सोमय्या यांना दोन दिवसात या प्रकरणाता खुलासा करण्याची नोटीस बजावण्यात आली. याच नोटीसीवरुन किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावरही टोकाच्या शब्दांमध्ये टीका केली. किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले? "माझी उद्धव ठाकरे यांना विचारणा आहे की, माझ्यावर गुन्हा कधी दाखल करणार? माझा दोष काय म्हणे तर मी सरकारी खुर्चीत कसा बसलो. तुमचं खोटं पकडलं म्हणून तुम्ही कर्मचाऱ्सांना लिपिकाला नोटीस बजावता? हिम्मत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. नाहीतर त्या लिपिक परीवाराची माफी मागा. ज्यांनी फोटो घेतले त्यांना नोटीस बजवायची की जे विक्टीम आहेत त्यांना नोटीस बजावायची? माझा दावा आहे की, उद्धव ठाकरे यांना माहिती आहे की. फोटो कोणी काढले. ही नोटीस कोणत्या कायद्या अंतर्गत बजावली? ही तर दादागिरी आहे", अशी शब्दांत किरीट सोमय्या यांनी रोष व्यक्त केला. "मी अनेक फाईलींचे अगदी सचिन वाझेच्या फाईलींची पहाणी केली आहे. तिथे सर्व ठिकाणी मला खुर्ची दिली होती. त्या सर्वांना नोटीस देणार का? हा तर इंग्रजांच्या काळातील कानून होता. की खुर्ची द्यायची नाही. तुम्ही तो कायदा आणणार का? आता लोकांनी स्वत:चा खुर्ची घेवून जायची का?", असा खोचक सवाल त्यांनी केला. (दोन लग्न, घटस्फोट, मुलाची कस्टडी खाजगी आयुष्यामुळे सतत चर्चेत राहिलीय Shweta) "तुम्ही राजकीय भ्रष्टाचार करता. लढाई या किरीट सोमय्याशी करा. हिंमत असेल तर केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी लढाई करा. त्या लिपिकाला तुम्ही नोटीस देता. मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे. मुख्यमंत्री माफी मागा. लिपिक परीवाराची माफी मागा. त्या फोटोत असं काय आहे? त्या फोटोसाठी तुम्ही किरीट सोमय्यांना नोटीस पाठवली की, दोन दिवसात एक्सप्लनेशन द्या. वा रे ठाकरे सरकार", असा घणाघात सोमय्यांनी केला. "फोटो किरीट सोमय्याचा, एक अधिकारी आणि लिपिकाचा आहे. हा फोटो दहा फुट लांबून घेतला आहे. फोटो सेल्फीचा नाहीय. मग ज्याने फोटो घेतला, अपलोड केला त्यांना नोटीस द्यायची की जे साक्षीदार (विक्टिम) आहेत त्यांना नोटीस द्यायची? उद्धव ठाकरेंना माहितीय की तो फोटो कोणी काढला. त्यांना माहिती असताना गरीब लिपिक कुटुंबावर बदला घेण्याचं पाप मुख्यमंत्र्यांनी केलं. फोटो कोणी काढलं ते तुम्ही सीसीटीव्हीने बघू शकता", असं सोमय्या म्हणाले. "मंत्रालय ही कोणाच्या बापाची मालकी नाही. ठाकरे सरकारने महाराष्ट्राला लुटायचे आणि ते उघडकीस आणले की असे वागायचे. मी पोलीस ठाण्यासह सर्व विभागातील सचिवांना तक्रार दिली आहे. इतकेच नाही तर ज्यांनी मला नोटीस बजावली ते अधिकारी शिंदेंनाही मी विचारले आहे, तुम्ही माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन केले आहे", असंही ते यावेळी म्हणाले. (काँग्रेसला भगदाड! महापौरांसह 27 नगरसेवकांच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ) "हा तर मंत्रालयाच्या सुरक्षेच्या, माझ्या झेड सुरक्षेबद्दल प्रश्न निर्माण करणारा आहे. ती व्यक्ती कोण हे जाहीर करा. ते सीसीटीव्ही फुटेज द्या. मला कळले की ते फुटेज गायब करण्यात आले आहेत. माझा आरोप आहे की तो उद्धव ठाकरेंचा माणूस होता. प्रताप सरनाईक कसे आले. मी फाईल पाहायला आलो हे प्रताप सरनाईकांना कोणी सांगितले. सरनाईकांना आत येण्याची मुभा कोणी दिली. प्रताप सरनाईकांवर कारवाई कधी करणार? सरनाईक बरोबर आलेल्या त्या माणसावर कारवाई कधी होणार?", असा सवाल त्यांनी केला. "हे प्लानिंग असू शकते. हा झेड सुरक्षा असलेल्या लोकाचा जिवाला धोका आहें. ही रियसल असू शकते. यापूर्वी माझ्यावर अनेकदा हल्ले झाले आहेत. हे मंत्रालय आहे, शिवसेनाभवन नाही. मी केंद्रीय गृहमंत्राला तक्रार केली आहे. मला सुरक्षा देणाऱ्या यंत्रणांकडे तक्रार केली आहे. त्यांचा नेमका उद्देश काय, हे तपासात बाहेर येईल. प्रताप सरनाईकांचा येण्याचा उद्देश काय?", असादेखील सवाल सोमय्या यांनी केला.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: Kirit Somaiya, Uddhav thackeray

पुढील बातम्या