मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'नवाब मलिक गेलेत, मात्र डर्टी डझनवर...'; किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

'नवाब मलिक गेलेत, मात्र डर्टी डझनवर...'; किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

भाजप नेते किरीट सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्या

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी हातामध्ये हातोडा घेऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. सोमय्या म्हणाले, की 'घोटाळेबाज सरकारचा हातात हातोडा घेऊन सत्यानाश करणार आहे'

ठाणे 26 मार्च : किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी हातामध्ये हातोडा घेऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. सोमय्या म्हणाले, की 'घोटाळेबाज सरकारचा हातात हातोडा घेऊन सत्यानाश करणार आहे. उद्धव ठाकरे काय म्हणतात, अनधिकृत बांधकाम करणार. हे काय मुख्यमंत्री आहेत. जनता असाच हातोडा घेऊन यांना बाहेर घालवणार आहे. हा साडेबारा कोटी जनतेचा हातोडा आहे. हा आमचा सत्याग्रह आहे, अशा शब्दांत सोमय्या यांनी सरकारवर निशाणा साधला. ST Employees Strike: "संप मागे घ्या, कोणाचीही नोकरी जाणार नाही, 31 मार्चपर्यंत कामावर या" - अनिल परब अनिल परबला आज ना उद्या मंत्रीमंडळातून बाहेर काढावं लागणार आहे. दोन्ही अनिल परबांचे रिसोर्ट आहेत. मग एकावरच कारवाई आणि दुसऱ्यावर का नाही? असा सवाल सोमय्या यांनी केला. सोमय्या पुढे म्हणाले, हे अनधिकृत बांधकामं तोडावं लागणार आहे. ठाकरे पोलिसांना नाचवतात पण पोलीस जनतेचे आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळे माफिया आणि वसुलीवाले आहेत. पुढे बोलताना सोमय्या म्हणाले, की 'हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक आहे. उद्धव ठाकरेंचं चाललं असतं तर माझे हातपाय त्यांनी कधीच तोडले असते, मात्र मला सुरक्षा आहे म्हणून मी वाचलो. माझ्या मागे जनता आहे, मोदी सरकारची झेड कॅटेगिरी सुरक्षा आहे. मी पुरावे दिलेत आणि मलाच जेलमध्ये टाकू म्हणतात. नवाब मलिक गेलेत, मात्र डर्टी डझनवर अजून कारवाई होणार आहे. चोरी लबाडी पकडली तर हे असं वागतात. हे चालू देणार नाही. माफियागिरी दाऊदगिरी महाराष्ट्रात चालू देणार नाही'. देवेंद्र फडणवीसांच्या जखमेवर मीठ, सकाळच्या शपथविधीवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला टोला उद्धव ठाकरेंवर टीका करताना सोमय्या यांनी सवाल केला, की आदित्य ठाकरेच्या प्रकरणाबाबत बोलण्याची तुमची हिंमत आहे का ? मेहुण्याच्या प्रकऱणावर बोलायची हिंमत ठेवा, असंही ते म्हणाले.
First published:

Tags: Kirit Somaiya, Uddhav thackeray

पुढील बातम्या