Home /News /mumbai /

Kirit Somaiya: "माझा मनसुख हिरण करण्याचा ठाकरे सरकारचा कट" किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Kirit Somaiya: "माझा मनसुख हिरण करण्याचा ठाकरे सरकारचा कट" किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

भाजप नेते किरीट सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्या

Kirit Somaiya: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

    मुंबई, 24 एप्रिल : भाजपचे नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांच्या गाडीवर काल रात्रीच्या सुमारास हल्ला झाला. हा हल्ला शिवसैनिकांनी केला असल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेनंतर आज किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. काल माझ्यावर पोलीस स्टेशन परिसरात जो हल्ला झाला तो ठाकरे सरकारने स्पॉन्सर केलेला हल्ला होता. माझ्यावर झालेल्या हल्ल्यामागे ठाकरे सरकारचा हात आहे. उद्धव ठाकरेंच्या निर्देशाखाली संजय पांडे यांनी हा हल्ला घडवून आणला असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी म्हटलं, पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या सांगण्यावरुन माझ्या नावाने चुकीचा एफआयआर नोंदवला गेला. एफआयआरवर सही करण्यास मी नकार देताच मला पोलिसांनी धमकावलं. सकाळीच भारत सरकारचे कॅबिनेट सेक्रेटरींसोबत चर्च केली. त्यांनी केंद्रीय गृहसचिव अजयकुमार यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितलं आहे. उद्या भाजपचं शिष्टमंडळ दिल्लीत जाणार आहे. वाचा : अमरावतीत शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश घारड यांच्यावर बेछूट गोळीबार माफीयांसारखा पोलिसांचा उपयोग करायचा आणि मनसुख हिरण सारखी अवस्था किरीट सोमय्या करायची असा कट उद्धव ठाकरे सरकारने केला आहे असंही किरीट सोमय्या म्हणाले. किरीट सोमय्या यांचा मनसुख हिरण करण्याचा डाव होता. आतापर्यंत मला तीन वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. काल माझ्या वाहनावर मोठा दगड फेकला पण अद्याप गुन्हा नाही. 70 ते 80 लोक पोलीस स्टेशनबाहेर जमा झालेच कसे? असा सवालही सोमय्यांनी उपस्थित केला. माझ्या गाडीवर दगडफेक झाली, चप्पल फेकल्या, बाटल्या फेकल्या. मोदीजी आणि देवाच्या कृपेमुळे आज मी बचावलो आहे. 8 सुरक्षारक्षकांच्या सुरक्षेमुळे बचावलो. गाडीची काच फुटल्याने मला दुखापत झाली. पोलिसांच्या संगमनताने हा हल्ला झाला आहे असंही किरीट सोमय्या म्हणाले. काल नेमकं काय घडलं? भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शनिवारी रात्रीच्या सुमारास दगडफेक झाल्याची घटना मुंबईत घडली आहे. शिवसैनिकांनी जोरदार दगडफेक केल्याचा आरोप केला जात आहे. तर सोमय्यांनीच आमच्या अंगावर गाडी चढवली असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. किरीट सोमय्या शनिवारी रात्री खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस स्टेशनला गेले होते. यावेळी किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. किरीट सोमय्या परत जात असताना खार पोलीस स्टेशनबाहेर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगड फेकल्याचे समोर आलं आहे. यापूर्वीही अशाप्रकारे त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून दगडफेक झाली आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BJP, Kirit Somaiya, Uddhav thackeray

    पुढील बातम्या