मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

"नवाब मलिकांचे कारस्थान आता हळूहळू समोर येऊ लागलेत" : किरीट सोमय्या

"नवाब मलिकांचे कारस्थान आता हळूहळू समोर येऊ लागलेत" : किरीट सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

  • Published by:  Sunil Desale
मुंबई, 23 फेब्रुवारी : भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. अलिबाग येथील कोर्लई ग्रामपंचायतीच्या हद्दीत रश्मी ठाकरे यांच्या नावावर असलेल्या जागेत 19 बंगल्यांचा उल्लेख आहे मात्र, ते बंगले आता नाहीयेत. या संदर्भात किरीट सोमय्या यांनी राज्यपालांची भेट घेत त्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर किरीट सोमय्यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधताना नवाब मलिक (Nawab Malik) यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे त्यावरही भाष्य केलं आहे. नवाब मलिक यांचे कारस्थान आता हळूहळू जनतेसमोर येत आहेत. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विनंती केली आहे की, अशी व्यक्ती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राहू शकते का? या संबंधी तपास करावा. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे तर माफियांना मदत करत असतात. म्हणून सकाळपासून ईडी-किरीट सोमय्या अशी परत ट्यून वाजवण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार का बोलत नाहीत? उद्धव ठाकरे 19 बंगल्यांबाबत एकही शब्द का बोलत नाहीत? आणि शरद पवार आजपर्यंत एक शब्द बोलत नाहीत की कोविड रुग्णालय... हजारो लोकांच्या जीवांशी खेळण्याचं पाप संजय राऊत यांचा पार्टनर सुजीत पाटकरने केलाय. अजित पवारांनी त्याला ब्लॅकमेल केलं त्यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार का बोलत नाहीत? असा सवालही किरीट सोमय्यांनी उपस्थित केला आहे. वाचा : नवाब मलिकांची ईडीकडून चौकशी सुरू, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ईडी कार्यालयावर धडकणार मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करणार नवाब मलिक यांचे जे काय आहे ते चौकशीत बाहेर येईल. चौकशीत नवाब मलिकांचे कारस्थान बाहेर आले तर निश्चितपणे भाजप महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मागणी करणार की ही व्यक्ती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही असंही किरीट सोमय्या म्हणाले. नवाब मलिक यांच्या संदर्भात जी काही माहिती माझ्याकडे होती ती संबंधित माहिती सर्वांना दिली आहे. राज्यपालांनाही सहा महिन्यापूर्वी ही माहिती दिली आहे. आम्ही सांगतो की, तुम्ही याबाबत चौकशी करा असंही किरीट सोमय्या म्हणाले. वाचा : "मुस्लिम कार्यकर्ता असल्यास दाऊदचं नाव घेतलं जातं" नवाब मलिकांवर कारवाई होणार याची पुसटशी कल्पना होतीच" : शरद पवार 19 बंगल्यांच्या संदर्भात राज्यपालांना माहिती दिली राज्यपालांना भेटून आम्ही मागणी केली की, उद्धव ठाकरे परिवाराने अॅग्रीमेंट केलं की माझे बंगले आहेत, टॅक्स भरतात. पण ज्यावेळी किरीट सोमय्या प्रश्न विचारतात की तुम्ही 19 बंगले कागदावर दाखवतात. ज्यावेळी निवडणूक विभागाची चौकशी सुरू झाली त्यावेळी फेब्रुवारी 2021 रश्मी ठाकरे यांनी पत्र लिहिलं की बंगले नव्हते आणि नाहीच. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जर लबाडी करत असतील तर त्यांना जनतेला उत्तर द्यावे लागेल.
First published:

Tags: Kirit Somaiya, Nawab malik, Sharad pawar

पुढील बातम्या