मुंबई, 15 एप्रिल : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप (Corruption allegation) करणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी आज मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे.
हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदींबाबत उद्धव ठाकरे गप्प का?
किरीट सोमय्या म्हणाले, जो हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी याला आपण कुठे लपवलं आहे त्याची माहिती आपण जनतेला द्यावी अशी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. उद्धव ठाकरेंचे पारिवारिक मित्र, बिझनेस पार्टनर नंदकिशोर चतुर्वेदी याला कुठे लपवलं आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्याची कृपा करावी.
आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, मेहुणा श्रीधर पाटणकर यांच्यासोबत नंदकिशोर चतुर्वेदीचे अनेक आर्थिक व्यवहार बाहेर आले आहेत. तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली तेव्हा काळालं की नंदकिशोर चतुर्वेदी गायब आहे. हवाला किंग एन्ट्री ऑपरेटर, ठाकरे सरकारचा पारिवारिक मित्र नंदकिशोर चतुर्वेदी गायब आहे. त्याला फरार घोषित करावं ही आमची मागणी आहे असंही सोमय्या म्हणाले.
वाचा : सोमय्यांच्या पीसीपूर्वीच राऊतांनी फोडला नवा बॉम्ब, सोमय्यांचा 'हा' घोटाळा काढणार
नंदकिशोर चतुर्वेदी हातात येत नाही. मला विश्वास आहे की, पुढील काही दिवसात नंदकिशोर चतुर्वेदीला तपास यंत्रणा फरार घोषित करतील. नंदकिशोरी चतुर्वेदींच्या एक डझन कंपन्यांची यादी आहे. याव्यतिरिक्त दुसऱ्या दोन डझन कंपन्यांचीही माहिती समोर आली आहे. नंदकिशोर चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरे यांच्या तीन कंपन्यांचा व्यवहार मी काही दिवसांपूर्वी दिला होता. मी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केलेल्या आरोपावर आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, तेजस ठाकरे यांनी आतापर्यंत एकही शब्द बोलला नाहीये. मग मी असं बोलायचं की, ठाकरे परिवार मनी लॉन्ड्रिंगमध्ये नंदकिशोर चतुर्वेदीचा वापर करत आहे? असा सवालही किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
वाचा : भोंग्यांच्या भूमिकेवरुन काका राज ठाकरेंना आदित्य ठाकरेंचा टोला
मी आज आणखी एक प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारु इच्छितो असं म्हणत किरीट सोमय्या यांनी म्हटलं, श्रीधर महादेव पाटणकर हे आपले मेहुणे, आपल्या पत्नीचे भाऊ आहेत. श्रीजी होम ही कंपनी आपल्या मेहुण्याची आहे. ती एक पार्टनरशिप कंपनी आहे. शिवाजी पार्क परिसरात कोट्यवधी रुपयांची इमारत आहे. या श्रीजी होम मध्ये 29 कोटी 62 लाख 29 हजार 320 रुपये मनी लॉन्ड्रिंग होऊन आले आहेत. मी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारत आहे की, तुम्हाला ही श्रीजी होम कंपनी माहिती आहे का? असा सवालही सोमय्यांनी उपस्थित केला आहे.
मनी लॉन्ड्रिंग करताना तुम्ही कुठल्या चतुर्वेदींची मदत घेतली. माझा थेट प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आहे या कंपनीचा आणि तुमचा काय संबंध आहे? 29 कोटी 62 लाख 29 हजार 320 रुपयांचं मनी लॉन्ड्रिंग.. श्री जी होम्स हे शिवाजी पार्क समोर इमारत बनवली. त्यात उद्धव ठाकरेंचे मेहुणे पार्टनर कम मालक कम संचालक आहेत असंही किरीट सोमय्या यांनी म्हचलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.