राजकारण पेटलं! भाजपच्या माजी खासदारांचा BMCवर गंभीर आरोप, केली पोलिसांत तक्रार

राजकारण पेटलं! भाजपच्या माजी खासदारांचा BMCवर गंभीर आरोप, केली पोलिसांत तक्रार

'29 तारखेला ते पॉझिटिव्ह आहेत असा त्यांना सेंटरमधून फोन आला आणि 30 तारखेला त्यांचा मृत्यू झाल्याचं ट्रॉमा सेंटरमधून त्यांना कळविण्यात आलं.'

  • Share this:

मुंबई 7 जून: कोरोनाव्हायरसचा मुंबईत प्रकोप सुरू असतानाच आता त्यावरून आरोप प्रत्यारोपांना सुरूवात होत त्यात राजकीय नेत्यांचा सहभागही वाढत आहे. महापालिकेच्या ट्रॉमा सेंट्रमध्ये ऑक्सिजन पुरवढा करणारी यंत्रणा सदोष आहे त्यामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाला अशी तक्रार माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. एका पीडित कुटुंबाला घेऊन त्यांनी जोगेश्वरीच्या ट्रॉमा सेंटर विरोधात पोलिसांमध्ये तक्रारही दिली आहे.

दाला भामरे या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा जोगेश्वरी इथल्या महापालिकेच्या ट्रॉमा सेंटरमध्ये मृत्यू झाला होता. ऑक्सिजनचा पुरवढा योग्य पद्धतीने झाला नसल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असं त्यांच्या कन्या नंदा यांचा आरोप आहे. त्या म्हणाल्या, 27 मे रोजी त्यांचे वडिल बेशुद्ध पडले होते. त्यानंतर त्यांना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 29 तारखेला ते पॉझिटिव्ह आहेत असा त्यांना सेंटरमधून फोन आला आणि 30 तारखेला त्यांचा मृत्यू झाल्याचं ट्रॉमा सेंटरमधून त्यांना कळविण्यात आलं असा दावा नंदा यांनी केली आहे.

स्थानिक आमदार अतुल भातखळकर आणि किरीट सोमय्या यांच्या सोबत जात त्यांनी दिंडोशी पोलीस स्टेशनला त्याबाबत तक्रारही दिली आहे. या सगळ्या घटनांचा व्हिडीओ किरीट सोमय्या यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे.

या प्रकरणावर ट्रॉमा सेंटरची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.

मुंबईत कोरोनारुग्णांची संख्या दररोज वाढत असून त्याला रोखायचं कसं असा प्रश्न पालिका आणि प्रशासनापुढे असून आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे.

First published: June 7, 2020, 6:34 PM IST

ताज्या बातम्या