Home /News /mumbai /

"अमित शहा आणि फडणवीसांच्या नावावर किरीट सोमय्यांनी कोट्यवधींची वसुली केली" संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

"अमित शहा आणि फडणवीसांच्या नावावर किरीट सोमय्यांनी कोट्यवधींची वसुली केली" संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

"अमित शहा आणि फडणवीसांच्या नावावर किरीट सोमय्यांनी कोट्यवधींची वसुली केली" संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

"अमित शहा आणि फडणवीसांच्या नावावर किरीट सोमय्यांनी कोट्यवधींची वसुली केली" संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

Kirit Somaiya Vs Sanjay Raut: शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पत्रकारांसोबत संवाद साधताना संजय राऊत यांनी सोमय्यांवर वसुलीची खळबळजनक आरोप केला आहे.

    मुंबई, 17 फेब्रुवारी : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांच्या विरोधात अत्यंत खळबळजनक आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी कोट्यवधी रुपयांची वसुली केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकंच नाही तर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरही वसुली केली असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. (Serious allegation against Kirit Somaiya by Sanjay Raut) अमित शहा, फडणवीसांच्या नावावर वसुली माझ्याकडे लोकांनी समोरून येऊन किरीट सोमय्याची 211 प्रकरणांची माहिती दिली आहे. गेल्या काही वर्षांत किरीट सोमय्याने साडेसात हजार कोटी रुपये वसुल केले आहेत. जशी ईडीच्या नावावर, सीबीआयच्या नावावर वसुली किरीट सोमय्याने केली. तशी सोमय्याने दिल्लीतील मंत्र्यांच्या नावावर वसुली केली आहे. अमित शहा यांच्या नावावरही वसुली केली असा खळबळजनक आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. वाचा : बीडमधील जलयुक्त शिवार घोटाळा प्रकरण; तीन निवृत्त अधिकाऱ्यांना अटक पवईतील पेरूबाग पासपोली येथे 38 एकरचा भूखंड आहे हा भूखंड सोमय्याने हडपला. पुनर्वसनाच्या नावाखाली 433 बोगस लोकांची घुसखोरी केली. किरीट सोमय्याचे एजंट तेथे आहेत आणि त्यांनी या 433 लोकांची घुसखोरी केली आहे. या पुनर्वसनावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केली. 433 लोकांकडून एजंटच्या मार्फत 25-25 लाख रुपये घेतले अशी माझी माहिती आहे. या घोटाळ्याच्या संदर्बात माझ्याकडे ट्रकभर कागदपत्र आहेत. तक्रारदार माझ्यासोबत आहेत. 300 कोटींहून अधिक रक्कम जमा केली. किरीट सोमय्या त्यावेळी सांगत होता, देवेंद्र फडणवीस यांना 50 कोटी रुपये द्यायचे आहेत. फडणवीसांच्या नावावर 300 कोटींची वसुली किरीट सोमय्या याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरही वसुली केली आहे. 300 कोटी रुपयांची वसुली फडणवीसांच्या नावाने केली आहे. हा घोटाळा 400 कोटींहून अधिकचा आहे. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर सुद्धा शेकडो कोटी गोळा केल्याची प्रकरण माझ्याकडे आली आहेत. आता त्यांच्या बाजुने जे कुणी बोलत आहेत ना त्यांनी बोलू नये नाहीतर उघडे व्हाल तुम्हीही अशा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. वाचा : राणे म्हणाले, मिलिंद नार्वेकर 'मातोश्री'मधील 'बॉय', नार्वेकरांचंही रोखठोक उत्तर मुख्यमंत्र्यांना सोमय्यांच्या घोटाळ्याची माहिती देणार त्या घोटाळ्याच्या फाईलवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केली. जे मुळ स्थानिक लोकं आहेत त्यांच्यावर अन्याय झाला आहे. पवईत 120 एकरचा भूखंड आहे. या घोटाळ्याच्या संदर्भात मी सर्व माहिती इकोनॉमिक अफेन्स विंगला देणार आहे. आता मी मुख्यमंत्र्यांना भेटायला चाललो आहे. सोमय्यांनी केलेल्या वसुलीची कदाचित देवेंद्र फडणवीस यांना माहिती नसावी असंही संजय राऊत म्हणाले. वाचा : महाविकास आघाडीची उद्या महत्त्वाची बैठक, काँग्रेसच्या नाराजीवर आता तोडगा निघणारच? महाआयटी घोटाळ्यातील आरोपींना पळवलं मागच्या सरकारमध्ये महाआयटी घोटाळा झाला. या घोटाळ्यातील आरोपींना पळवून लावण्यात आलं अशी माझीही माहिती आहे. आता केंद्र सरकारला आम्ही विचारु अमोल काळे आणि इतर कुठे आहेत? 25 हजार कोटींचा घोटाळा आहे. त्याचं मनी लॉन्ड्रिंग झालं आहे. जर ईडी ऐकत असेल तर मी पुन्हा बोलतो, 25 हजार कोटींची महाराष्ट्रातील महाआयटीत झाला आहे आणि त्यातील मुख्य आरोपीला पळवून लावलं आहे. जसे विजय माल्या, निरव मोदी, मेहुल चोक्सी हे गेले आहेत. महाआयटी घोटाळ्यातील आरोपी नॉट रिचेबल आहेत. किरीट सोमय्या याची महाराष्ट्रातील नागरिक धिंड काढतील. त्याचे कपडे काढून लोक धिंड काढतील एकदिवस असंही संजय राऊत म्हणाले.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Amit Shah, Devendra Fadnavis, Kirit Somaiya, Sanjay raut, Shiv sena

    पुढील बातम्या