मुंबई, 14 सप्टेंबर : महाविकास आघाडी सरकारच्या (mva government) मंत्र्यांवर भाजपकडून (bjp) आरोपाचा मारा सुरूच आहे. आता राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांचावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी (kirit somiya) गंभीर आरोप केले असून 2700 पानी पुरावे (2700 page evidence) घेऊन ईडीच्या कार्यालयात पोहोचले आहे.
किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखानामध्ये कोट्यवधी रुपयांची बेनामी शेअर कॅपिटल भ्रष्टाचार झालेचे पुरावे घेऊन माजी खासदार किरीट सोमय्या ठरल्याप्रमाणे आज दुपारी ईडीच्या कार्यालयात पोहोचले. ईडीमधील ४ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर बैठक झाली. कागदोपत्री पुरावे दिले आहेत, अशी माहिती सोमय्यांनी दिली.
मोठी बातमी! देशातील 'या' टॉप IT कंपन्यांचं Work From Home होणार बंद; बघा लिस्ट
'काल हसन मुश्रीफ बोलत होते त्यांना मी आज सांगतो, सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाण्यात घोटाळा केला. या कंपनीत हसन मुश्रीफ परीवार शेअर होल्डर आहेत. शेतकरी शेअर होल्डर नाहीत, असा दावा सोमय्यांनी केला.
शेतकऱ्यांनी या साखर कारखान्यामध्ये गुंतवणूक केली आहे. पण हसन मुश्रीफ परिवारामधील सहा व्यक्तींचा सहभाग असल्याचा किरीट सोमय्या यांनी दावा केला आहे.
हातात हिरवा चुडा अन् केसात मोगऱ्याचा गजरा; मराठमोळ्या लुकमध्ये दिसली जेनीलिया
अबिद हसन मुश्रीफ ,नाविद हसन मुश्रीफ, साजिद हसन मुश्रीफ, नबिला अबिद मुश्रीफ, सबिना साजिद मुश्रीफ, साहेरा हसन मुश्रीफ, यांची नावे आहेत. या व्यक्तीच्या नावाने 13 कोटी 30 लाख 49 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे.
मात्र. हसन मुश्रीफ यांनी भ्रष्टाचार करून काळा पैसा पांढरा करून मनी लाँड्रिंग करून 78 कोटी 91 लाख 51 हजार 830 रुपयांचे शेअर घेण्यात आले आहेत.
रजत कंस्युमर सर्विसेस प्रा.लि., माऊंड कॅपिटल प्रा.लि., मरू भूमी फायनस अँड डेव्हलपर्स प्रा.लि. नेक्स्ट जेन कन्सल्टंसी सर्विसेस सर सेनापती शुगर्स या कंपन्यांचा समावेश आहे. याबद्दल सोमय्यांनी 2700 पानी पुरावे ईडीकडे जमा केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.