Home /News /mumbai /

किरीट सोमय्या मंत्रालयात पोहोचले, अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून कुणाची फाईल तपासली? PHOTO मुळे खळबळ

किरीट सोमय्या मंत्रालयात पोहोचले, अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून कुणाची फाईल तपासली? PHOTO मुळे खळबळ

किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर एकदाही टीकेची संधी सोडत नाही. पण अचानक किरीट सोमय्यांच्या एका फोटोमुळे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये खळबळ उडाली.

किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर एकदाही टीकेची संधी सोडत नाही. पण अचानक किरीट सोमय्यांच्या एका फोटोमुळे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये खळबळ उडाली.

किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर एकदाही टीकेची संधी सोडत नाही. पण अचानक किरीट सोमय्यांच्या एका फोटोमुळे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये खळबळ उडाली.

    मुंबई, 25 जानेवारी : महाविकास आघाडी सरकारवर (mva government) या ना त्या मुद्यावरून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात माहीर असलेले भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somiya) यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे.  किरीट सोमय्या मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून काही फायली चाळल्या होत्या. या फोटोमुळे एकच खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर एकदाही टीकेची संधी सोडत नाही. पण अचानक किरीट सोमय्यांच्या एका फोटोमुळे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये खळबळ उडाली.   काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या मंत्रालयात गेले होते. त्यावेळी त्यांनी नगरविकास खात्याच्या विभागाला भेट दिली होती. यावेळी एका अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून ते फायली चाळत होते. याबद्दलचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, या फोटोमध्ये नगरविकास विभागाचे अधिकारी हे उभे असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, किरीट सोमय्यांनी काही दिवसांपूर्वी प्रताप सरनाईक यांच्यावर विहंग इमारतीच्या बांधकामावरून गंभीर आरोप केला होता. त्यानंतर हा फोटो आता समोर आला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी किरीट सोमय्या यांच्या या फोटोवर आक्षेप घेतला आहे. सदर मंत्रिमंडळातील टिप्पणी ही पुढील बैठकीत इतिवृत्तांत जोपर्यंत मंजूर केली जात नाही तोपर्यंत माहिती अधिकारात उपलब्ध केली जाऊ शकत नाही व गोपनीय स्वरुपात मोडते. त्यामुळे या टिप्पणीला इतिवृतांतात मंजुरी मिळाली का? नसेल तर सोमय्या यांना कशी मिळाली याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीच सावंत यांनी केली. (नक्की कुठून करावी अभ्यासाची सुरुवात? वाचा उत्तम मार्क्स मिळवण्याचा गुरुमंत्र) तसंच, किरीट सोमय्या कोणत्या अधिकाराखाली याठिकाणी गेले होते. ते तिथे कोणत्या फायली तपासात होते, हे त्याच मानसिकतेचं दर्शन आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही सावंत यांनी केली. दरम्यान, या प्रकरणी आता कारवाई करण्यात आली आहे. संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. किरीट सोमय्या यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. परंतु, या कारवाईवर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी आक्षेप घेतला आहे. 'सोमय्या अधिकऱ्यांच्या खुर्चीवर बसले म्हणून कारवाई करणे निषेधार्य आहे. हा मोघलाईचा कारभार सुरू आहे. लहर आली की लगेच निलंबित करा असे सुरू आहे. यापूर्वी कुठला नेता अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसला नाही का? असा सवाल दरेकरांनी विचारला.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Kirit Somaiya, किरीट सोमय्या, मंत्रालय

    पुढील बातम्या