Home /News /mumbai /

Kirit Somaiya: झेड सिक्युरिटी असतानाही हल्ला कसा झाला? वाचा काय म्हणाले किरीट सोमय्या...

Kirit Somaiya: झेड सिक्युरिटी असतानाही हल्ला कसा झाला? वाचा काय म्हणाले किरीट सोमय्या...

झेड सिक्युरिटी असतानाही हल्ला कसा झाला? वाचा काय म्हणाले किरीट सोमय्या...

झेड सिक्युरिटी असतानाही हल्ला कसा झाला? वाचा काय म्हणाले किरीट सोमय्या...

Kirit Somaiya: राणा दाम्पत्याला अटक झाल्यावर भाजप नेते किरीट सोमय्या हे खार पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. त्यानंतर तेथून परतत असताना सोमय्यांच्या गाडीवर दगड भिरकावण्यात आला.

    मुंबई, 24 एप्रिल : खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांना काल मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या हे खार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. तेथून निघाल्यावर सोमय्यांच्या गाडीवर हल्ला (Attack on Kirit Somaiya car) झाला. या हल्ल्यात सोमय्यांच्या गाडीची काच फुटली आणि त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली. हा हल्ला शिवसैनिकांनी केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, किरीट सोमय्या यांना झेड प्लस सिक्युरिटी असतानाही हल्ला कसा झाला हा प्रश्न विचारण्यात येत आहे. यावर आता सोमय्यांनी सुद्धा भाष्य केलं आहे. किरीट सोमय्या म्हणाले, झेड सिक्युरिटीचा अर्थ असा आहे की, जे प्रोटेक्टी आहेत किरीट सोमय्या आहेत त्यांची सुरक्षा करणं. झेड सिक्युरिटी कायद्यात लिहिलं आहे की, लोकल बंदोब्त हा स्थानिक पोलिसांनी करायचा आहे. तिन्ही जागेवर स्थानिक पोलिसांनी हे केलं नाही. पुण्यात गायब झाले. काल मला शिवसैनिकांत सोडून निघून गेले. क्लिअरन्स त्यांनी कमांडोंच्या समक्ष दिलं. वाशिममध्ये सुद्धा तेच केलं. या झेड सुरक्षा रक्षकांमुळे माझे प्राण वाचले. पण कधी असंही होईल की प्रत्येकवेळी ते मला वाचवू शकणार नाहीत. यापूर्वी घडलेल्या दोन हल्ल्यांनंतर केंद्रीय गृहसचिवांनी महाराष्ट्र पोलिसांना वॉर्न केलं होतं. माझी माहिती आहे की, काल माझ्या कमांडो सुप्रीटेन्डंट यांनी पोलिसांना कळवलं होतं मात्र, तरीही पोलिसांनी हे केलं. त्यामुळे दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. "माझा मनसुख हिरण करण्याचा ठाकरे सरकारचा कट" किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. काल माझ्यावर पोलीस स्टेशन परिसरात जो हल्ला झाला तो ठाकरे सरकारने स्पॉन्सर केलेला हल्ला होता. माझ्यावर झालेल्या हल्ल्यामागे ठाकरे सरकारचा हात आहे. उद्धव ठाकरेंच्या निर्देशाखाली संजय पांडे यांनी हा हल्ला घडवून आणला असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. माफीयांसारखा पोलिसांचा उपयोग करायचा आणि मनसुख हिरण सारखी अवस्था किरीट सोमय्या करायची असा कट उद्धव ठाकरे सरकारने केला आहे असंही किरीट सोमय्या म्हणाले. किरीट सोमय्या यांचा मनसुख हिरण करण्याचा डाव होता. आतापर्यंत मला तीन वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. काल माझ्या वाहनावर मोठा दगड फेकला पण अद्याप गुन्हा नाही. 70 ते 80 लोक पोलीस स्टेशनबाहेर जमा झालेच कसे? असा सवालही सोमय्यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीसंनीही उपस्थित केला सवाल देवेंद्र फडणवीस म्हणाले, नवनीत राणा यांना भेटण्यासाठी पोलिस ठाण्यात येतोय, हे किरीट सोमय्या यांनी पोलिसांना कळविले होते. त्यांना झेड प्लस सुरक्षा आहे. हल्ला होणार, हे सुद्धा त्यांनी आधीच पोलिसांना सांगितले होते. असे असताना पोलिसांनी खबरदारी घेतली नाही. पोलिसांच्या मदतीने ही गुंडगिरी सुरू आहे. या घटनेने मुंबई पोलिसांची अब्रू या पोलिसांनी घालविली आहे. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. या प्रकरणात कठोर कारवाईची आमची गृहमंत्री आणि गृहसचिवांकडे मागणी आहे. आम्ही घाबरून जाऊ असे समजू नका. जशाच तसे उत्तर उत्तर देण्याची आमचीही क्षमता आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BJP, Kirit Somaiya, Mumbai police

    पुढील बातम्या