किरीट सोमय्यांना गरबा पडला महागात,मुंबई भाजपच्या रेल्वे समितीतून डच्चू

किरीट सोमय्यांना गरबा पडला महागात,मुंबई भाजपच्या रेल्वे समितीतून डच्चू

भाजपनं रेल्वे सुधारणांसाठी बनवलेल्या समितीतून किरीट सोमय्यांना डच्चू देण्यात आलाय.

  • Share this:

मुंबई, 01 आॅक्टोबर : चेंगराचेंगरीच्या दिवशी गरबा खेळणं भाजप खासदार किरीट सोमय्यांना चांगलंच महागात पडलंय. भाजपनं रेल्वे सुधारणांसाठी बनवलेल्या समितीतून किरीट सोमय्यांना डच्चू देण्यात आलाय.

एकेकाळी भाजपचा रेल्वेसंबंधीच्या प्रश्नांचा आवाज म्हणून किरीट सोमय्यांची ओळख होती. पण किरीट सोमय्यांना आता रेल्वेच्या समितीत घेण्यात आलेलं नाही. एकप्रकारे किरीट सोमय्यांवर भाजपनं ही कारवाईच केल्याचं मानलं जातंय.

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे प्रश्नावर पाठपुरावा करण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत आशिष शेलारांसह मधू चव्हाण, भाई गिरकर, प्रभाकर शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे.

सोमय्या यांना यातून वगळण्याचा निर्णय प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.

एलफिन्स्टन ब्रिजवरच्या चेंगराचेंगरीत 23 जणांचे बळी गेले. या बातमीनं सर्वसामान्यही सुन्न होऊन गेले. नवरात्रीचा सण सुरू असूनही अनेकांनी मृत आणि जखमींबद्दल सहवेदना व्यक्त केली. अशा वेळी नेते मंडळींचा हा कोडगेपणा चीड आणणारा ठरतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2017 08:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading