Home /News /mumbai /

Kirit Somaiya: 100 कोटींचा शौचालय घोटाळा बाहेर काढण्याचा संजय राऊतांनी दिला इशारा अन् किरीट सोमय्यांनी केला 'हा' खुलासा

Kirit Somaiya: 100 कोटींचा शौचालय घोटाळा बाहेर काढण्याचा संजय राऊतांनी दिला इशारा अन् किरीट सोमय्यांनी केला 'हा' खुलासा

Kirit Somaiya: किरीट सोमय्या कुटुंबाने केलेला शौचालय घोटाळा बाहेर काढणार असल्याचं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं. त्यानंतर या प्रकरणात किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, 17 एप्रिल : किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya) कुटुंबीयांनी शेकडो कोटींचा टॉयलेट घोटाळा (Toilet Scam) केला असून लवकरच हा घोटाळा बाहेर काढण्यात येईल असं विधान दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं होतं. त्यानंतर या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपली बाजू मांडली आहे. या संदर्भात किरीट सोमय्या यांनी नगरविकास विभागाला एक पत्र लिहिलं असून हा 100 कोटींचा आकडा आला कुठून असा सवालही उपस्थित केला आहे. काय म्हटलं आहे सोमय्यांनी पत्रात? आपल्या पत्रात किरीट सोमय्या यांनी म्हटलं, भाजप, युवक प्रतिष्ठान, प्रा. मेधा सोमय्या, डॉ. किरीट सोमय्या यांनी कोणताही अशा प्रकारचा शौचालय घोटाळा केला नाही, हे मी स्पष्ट करु इच्छितो. ज्या शौचालय घोटाळ्याची चर्चा सुरू आहे ती घटना केव्हा झाली हे अजूनपर्यंत कोणीही सांगितले नाही. त्या संबंधी स्पष्टता करावी. माझ्या आठवणी प्रमाणे गेल्या 10 वर्षांत मीरा-भाईंदर महानगरपालिका किंवा पर्यांवरण मंत्रालय... यांच्याकडून शौचालय किंवा कांदळवन अशा प्रकारचा कोणताही विषय, पत्र, प्रश्न आलेला नाही. किंबहुना 15 वर्षांत अशा प्रकारचा विषय झालेला दिसत / आठवत नाही. वाचा : नंदकिशोर चतुर्वेदीच्या कंपन्यांची यादी जाहीर करत सोमय्यांचा ठाकरे कुटुंबावर आरोप गेल्या 10 ते 12 वर्षांत अशा प्रकारचे कोणतेही पत्र मिरा-भाईंदर महानगरपालिका, मिरा भाईंदर पोलीस, मुंबई, पोलीस, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वन विभाग अधिकारी ठाणे, वन विभाग मंत्रालय, कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ), कांदळवन विभाग / अधिकारी या कोणाचेही एकही असे कुठले पत्र, चर्चा, चौकशीही आमच्याकडे आलेली आठवत नाही, आलेलेच नाही. एका बाजूला शौचालय संबंधी खोटी कागदपत्रे दाखवून रु 3,90,52,000 ची बिले घेतली असा उल्लेख केला जातो. त्याचसोबत 100 कोटींचा घोटाळा याचाही उल्लेख होत असतो याची दखल घ्यावी व स्पष्टता करावी. सगळ्यात महत्त्वाची बाब अशी की, हा प्रकल्प केव्हाचा आहे याचा अजूनपर्यंत कोणी उल्लेख पण केला नाही, त्यासंबंधी एक कागदपत्रही दिले नाही. या संबंधी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यापूर्वी या संपूर्ण उपरोक्त गोष्टीचा पुन्हा एकदा विचार करावा, अभ्यास करावा, आवश्यकता असल्यास आमच्याशी संपर्क करावा, आम्हीही संबंधित माहिती द्यायला तयार आहोत असंही पत्रात म्हटलं आहे. काय म्हणाले होते संजय राऊत? लवकरच या महाशयांचा मी एक टॉयलेट घोटाळा काढणार आहे. मीरा भाईंदर मनपा आणि महाराष्ट्रात इतरत्र काही कोटींचा घोटाळा झालाय. कुठे कुठे पैसे खातायत तर विक्रांत पासून ते टॉयलेट पर्यंत. ही सर्व कागदपत्रे सूपूर्त झाली आहेत. युवा प्रतिष्ठान नावाची जी काही एनजीओ ही लोकं चालवत होती त्यांनी शेकडो कोटी रुपयांचा टॉयलेट घोटाळा केलाय. खोटी बिलं, पर्यावरणाचा ऱ्हास करुन निर्माण केलेले हे सर्व घोटाळे... हा घोटाळा लवकरच बाहेर येईल. तुम्ही फक्त आता खुलासे करत बसा असं संजय राऊत म्हणाले होते.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: BJP, Kirit Somaiya, Sanjay raut, Shiv sena

पुढील बातम्या