किरीट सोमय्यांचं शिवसैनिकांवर टीकास्त्र, म्हणाले...

किरीट सोमय्यांचं शिवसैनिकांवर टीकास्त्र, म्हणाले...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कामातून दरारा निर्माण करा असं आवाहन शिवसैनिकांना केलं होतं. पण शिवसैनिक...

  • Share this:

प्रणाली कापसे, प्रतिनिधी

मुंबई, 24 डिसेंबर : राज्यात सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर भाजप नेत्यांनी शिवसेनेवर सडकून टीका सत्रं सुरू केलं आहे. भाजपने नेते किरीट सोमय्यांनी आता शिवसैनिकांवर दहशत निर्माण करत असल्याचा आरोप केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कामातून दरारा निर्माण करा, असं आवाहन शिवसैनिकांना केलं होतं. पण शिवसैनिक मात्र दहशत निर्माण करतात. सर्वसामान्य लोकांचा खेळ करताय असं राज्य अशी दहशत आम्ही खपवून घेणार नाही, असं वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

किरीट सोमय्या यांनी आज पीडित हिरामणी तिवारी यांची भेट घेतली. हिरामणी तिवारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या फेसबुक कमेंटमुळे नाराज होऊन शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांनी भर चौकात हिरामणी तिवारी यांचं मुंडन केलं होतं. त्यानंतर त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता.

त्यामुळे हिरामणी तिवारी हे दुखावले असून आपली माफी मागितली जावी, अशी त्यांची मागणी आहे. शिवाय सार्वजनिकरीत्या अपमान करणाऱ्या शिवसैनिकांच्या विरोधात कडक कारवाई व्हावी, त्यांना अटक केली जावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

या प्रकरणात पोलीसही योग्य ती कारवाई करत नसल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला आहे. गरज पडली तर आपण राज्यपालांना ही भेटायला जाणार असंही किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

अमृता फडणवीस Vs शिवसैनिक

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर रविवारी बोचरी टीका केली होती. त्यावरून शिवसेनेही त्यांच्यावर पलटवार करत खडे बोल सुनावले होते. पिंपरी चिंचवडमध्ये या मुद्द्यावर शिवसेना चांगलीच तापली. अमृता फडणवीस यांच्या फोटोलो जोडो मारो आंदोलन करण्यात आलं. त्यावर आता अमृता फडणवीसांनी पुन्हा एका शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.  ‘दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका,  हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे !’ अशा शब्दात अमृता फडणवीसांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये अमृता फडणवीस यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करत शिवसेना महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. तर अशा टीका थांबवा अन्यथा घरात घुसून मारू, अशा शब्दात शिवसेनेकडून धमकी देण्यात आली होती. डोक्यावर चप्पल मारत नेतृत्त्व करता येत नाही, असं अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.

खंरतर ‘रेप इन इंडिया’बाबत वक्तव्य केल्यामुळे राहुल गांधी यांच्याविरोधातही भाजपने पुण्यात फोटोला जोडो मारो आंदोलन केलं होतं. त्यामुळे शिवसेनेनंही अमृता फडणवीस यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन केलं. कधी नव्हे ते अमृता फडणवीसांनी अतिशय आक्रमकपणे टीका केल्याने राजकीय चर्चेला वेगळी सुरुवात झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 24, 2019 05:26 PM IST

ताज्या बातम्या