Home /News /mumbai /

हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाकडून 127 कोटींचा घोटाळा; किरीट सोमय्यांचा मोठा आरोप

हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाकडून 127 कोटींचा घोटाळा; किरीट सोमय्यांचा मोठा आरोप

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. सोमय्यांनी 2700 पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत.

    मुंबई, 13 सप्टेंबर : माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांबाबत गंभीर वक्तव्य केलं होतं. भाजप तसंच राष्ट्रवादीच्या काही नेत्यांबाबत सोमवारी मोठा खुलासा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. सोमय्यांनी 2700 पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत. हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियांनी कोट्यवधींचे घोटाळे केले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 127 कोटींचे पुरावेही आपल्याकडे असल्याचं सोमय्या म्हणाले. मनी लाँडरिंग, बेनामी संपत्ती विकत घेण्याचे पुरावेचं त्यांनी सादर केले आहेत. 2018-19 मध्ये इन्कम टॅक्सकडून मुश्रीफ यांच्या घरावर धाडीही टाकण्यात आल्या होत्या. भाजप नेते किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून मविआ सरकारमधील मंत्री, नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. किरीट सोमय्या यांच्याकडून आरोप करण्यात आल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्या पक्षांच्या विरुद्ध आणि आमच्या नेत्यांविरुद्ध बिनबुडाचे खोटे आरोप केले जात असल्याचंही ते म्हणाले. किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं ते म्हणाले. माझ्या 17 वर्षांच्या कार्यकाळात एकही आरोप झाले नाहीत. माझ्या घरावर आणि कारखान्यावर इन्कम टॅक्सची धाड पडली होती, त्यावेळीही त्यांना काहीही सापडलं नसल्याचं मुश्रीफ म्हणाले.
    Published by:Karishma
    First published:

    पुढील बातम्या