News18 Lokmat

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची पाळंमुळं खोलवर आणि गंभीर - हायकोर्ट

"तेलतुंबडेंच्या विरोधात खटला चालवण्यासाठीचे पुरावे आहेत. हा गंभीर गुन्हा आहे"

News18 Lokmat | Updated On: Dec 24, 2018 11:30 PM IST

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची पाळंमुळं खोलवर आणि गंभीर - हायकोर्ट

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 24 डिसेंबर : "कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची पाळंमुळं खोलवर रुजलेली असून त्याचे गंभीर परिणाम झाले", असल्याचं मत मुंबई हायकोर्टाच्या जस्टिस बी पी धर्माधिकारी आणि एस व्ही कोतवाल खंडपीठाने व्यक्त केलं आहे.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी हायकोर्टाने शहरी नक्षलवादाच्या प्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची आनंद तेलतुंबडे यांची याचिका फेटाळून लावली. त्याचा विस्तृत आदेश आज सोमवारी जारी करण्यात आला. त्यात या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे.

खंडपीठानं आदेशात म्हटलंय की, "तेलतुंबडेंच्या विरोधात खटला चालवण्यासाठीचे पुरावे आहेत. हा गंभीर गुन्हा आहे. तसंच यातील कट-कारस्थानही गंभीर असून त्याचे परिणामही गंभीर आहेत. या कटाचा प्रकार आणि गांभीर्य लक्षात घेता आरोपीविरोधात चौकशी पथकाला पुरेसे पुरावे गोळा करण्याची संधी दिली जाईल."

या प्रकरणाच्या चौकशीविषयी समाधान व्यक्त करताना खंडपीठाने म्हटलं की, "तेलतुंबडेंविरोधात पोलिसांकडे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत तसंच त्यांच्याविरोधात लावण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे नाहीत. पोलीस करत असलेली चौकशी केवळ कोरेगाव भीमा येथील हिंसाचारापुरती मर्यादित नसून ती घटना घडण्यासाठी काय गोष्टी झाल्या आणि त्यानंतरच्या घडलेल्या गोष्टी अशी व्यापक" असल्याचंही कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.

Loading...

"त्याचबरोबर तेलतुंबडे यांची प्रतिबंधित संघटना सीपीआयशी माओवादी संबंधाची देखील चौकशी होणे गरजेचे आहे" असं देखील कोर्टाने म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 24, 2018 11:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...