Home /News /mumbai /

रत्नागिरी जिल्ह्यात भाजपला धक्का, शशिकांत चव्हाण यांचा शिवसेनेत प्रवेश

रत्नागिरी जिल्ह्यात भाजपला धक्का, शशिकांत चव्हाण यांचा शिवसेनेत प्रवेश

योगेश कदम यांना विधानसभा निवडणुकीत तेव्हा त्यांचाच मित्र पक्ष असलेल्या भाजपकडून दगाफटका झाल्याची चर्चा होती.

खेड, 26 जुलै : एकेकाळी शिवसेनेत ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे शशिकांत चव्हाण मध्यंतरी काही कारणामुळे शिवसेनेला सोडून त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र आज त्यांनी पुन्हा भाजपला रामराम करत महाराष्ट्राचे माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केला आहे, शशिकांत चव्हाण हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे. अनेक वर्षे त्यांनी शिवसेना जिल्हाध्यक्ष म्हणून पद भूषवले होत. मात्र काही कारणाने शिवसेनेपासून दूर जात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपची उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात असणाऱ्या खेड , दापोली , मंडणगड, गुहागर ,चिपळूण या तालुक्यात मोठी ताकद वाढली होती. मात्र पुन्हा एकदा त्यांनी रामदास कदम यांच्या मुंबई येथील निवासस्थानी आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. चव्हाण यांच्या प्रवेशाने आता उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात आणि विशेषतः दापोली - खेड विधानसभा मतदार संघात याठिकाणी शिवसेनेची ताकद वाढली आहे. लवकरच शशिकांत चव्हाण यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली, जाईल अशी चर्चा देखील सुरू आहे. माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम हे दापोली विधानसभा मतदार संघात सेनेचे विद्यमान आमदार आहेत. योगेश कदम यांना विधानसभा निवडणुकीत तेव्हा त्यांचाच मित्र पक्ष असलेल्या भाजपकडून दगाफटका झाल्याची चर्चा होती. भाजपने सेनेच्या विरोधात उघड उघड काम केल्याचं बोललं जात होतं. त्यामुले आता उत्तर रत्नागिरीचे प्रभारी शशिकांत चव्हाण हे पुन्हा सेनेत स्वगृही परतल्याने सेनेची ताकत वाढली आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Shivsena

पुढील बातम्या