VIDEO: लॉकडाऊनमध्येच मुंबईत खातूंच्या गणेश मूर्ती कार्यशाळेला आग

VIDEO: लॉकडाऊनमध्येच मुंबईत खातूंच्या गणेश मूर्ती कार्यशाळेला आग

आगीचं प्राथमिक कारण शॉर्ट सर्किट असल्याचं सांगितलं जातंय. आगीत कुणीही जखमी झालेलं नाही.

  • Share this:

मुंबई 02 मे: मुंबईत चिंचपोकळी रेल्वे स्थानका बाहेरील गणेश टॉकिज परीसरातील प्रसिद्ध गणेश मूर्तीकार विजय खातू यांच्या गणेश मूर्ती कार्यशाळेला आग लागली. सध्या लाँकडाऊन सुरू असल्यामुळे कार्यशाळेत कोणीही नव्हते. मात्र लागलेल्या आगीने कार्यशाळेचं मोठं नुकसान केलंय. घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ पोहचून आग आटोक्यात आणली. आगीचं प्राथमिक कारण शॉर्ट सर्किट असल्याचं सांगितलं जातंय.

दिवसा तापमान वाढत आहे. त्यामुळेही जास्त काळजी व्हायला पाहिजे असं मत अग्निशमन विभागाने व्यक्त केलं.

बाधितांची संख्या वाढली

देशात कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस वाढतच आहे. जगातल्या इतर देशांपेक्षा भारतात कोरोनाचा उद्रेक नियंत्रणात असला तरी संख्येत दररोज वाढ होत आहे. कोरोबाधितांची संख्या आता 37776 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 1223वर गेला आहे. जगात आत्तापर्यंत 32 लाख लोक बाधित असून 2 लाख 28 हजार जणांचा त्यामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोरोना व्हायरसचं ‘म्युटेशन’ झालं आहे का याचा अभ्यास ICMRचे संशोधक करत आहेत.

व्हायरसचं औषध शोधण्यासाठी अशा प्रकारच्या अभ्यासाची गरज असते. ‘म्युटेशन’ म्हणजे कोव्हिड व्हायरमध्ये अनुवांशिक बदल झाला आहे का याचा शोध घेणं. हा व्हायरस अधिक आक्रमक किंवा धोकादायक झाला आहे का? याचा अंदाजही यातून येणार आहे.

हे वाचा आणि बघा 

बापरे! सिमेंट मिक्स करणाऱ्या अजस्त्र टाकीत बसले 18 मजूर, VIDEO पाहून बसेल धक्का

VIDEO अडकलेल्या परप्रांतिय मजुरांचा उद्रेक, पोलिसांवर केली तुफान दगडफेक

First published: May 2, 2020, 8:32 PM IST

ताज्या बातम्या