राज्यातला पहिला-वहिला टोल नाका आज मध्यरात्रीपासून होणार बंद

राज्यातला पहिला-वहिला टोल नाका आज मध्यरात्रीपासून होणार बंद

  • Share this:

13 मे : राज्यातील पहिला टोल नाका अशी ओळख असलेला ठाण्यातील खारेगाव टोल नाका अखेर आजपासून  कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. आज मध्यरात्रीपासून हा टोलनाका बंद होणार आहे.

मुंबई-नाशिक हायवेवरील या रस्त्याच्या उभारणी आणि देखभालीचा खर्च वसूल झाल्याचे आयआरबी कंपनीने म्हटलं आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने हा टोल नाका बंद करण्याचे आदेश दिले होते. अखेर वाहनचालकांची टोलच्या कटकटीतून सुटका होणार आहे.

मुंबईहून नाशिककडे जाताना ठाण्यानंतर लागणारा पहिला टोल नाका म्हणजे भिवंडी बायपासवरील खारेगावचा टोल नाका. इथून दिवसाला हजारो वाहने ये-जा करतात. त्यातून आयआरबी कंपनीला दिवसाला लाखो रुपयांचा टोल मिळतो. 1998 साली हा टोल नाका उभारण्यात आला होता. तेव्हापासून रस्त्याची उभारणी आणि देखभालीच्या खर्चापोटी 180 कोटी रुपये कंपनीला वसूल करायचे होते.

टोल नाका बंद होणार म्हटल्यानंतर वाहनचालकांचीही महिन्याला हजारो रुपयांची बचत होणार आहे. त्यामुळे साहजिकच वाहनचालकांनी या गोष्टीवर आनंद व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 13, 2017 10:38 AM IST

ताज्या बातम्या