मंत्रालयात तीन लाख उंदीर मग शासकीय कार्यालयात किती? खडसेंचा विधिमंडळात सवाल

मंत्रालयात तीन लाख उंदीर मग शासकीय कार्यालयात किती? खडसेंचा विधिमंडळात सवाल

मंत्रालयात झालेले उंदीर आणि त्यांना मारण्यासाठी झालेल्या घोटाळ्याचा मुद्दा भाजप नेते एकनाथ खडसे यांनी गंभीर विषयावरून सरकारचे विशेषतः मुख्यमंत्री यांच्या ताब्यात असलेल्या सामान्य प्रशासनाला चांगलेच चिमटे काढले.

  • Share this:

प्रफुल्ल साळुंखे, मुंबई, 22 मार्च : मंत्रालयात झालेले उंदीर आणि त्यांना मारण्यासाठी झालेल्या घोटाळ्याचा मुद्दा भाजप नेते एकनाथ खडसे यांनी गंभीर विषयावरून सरकारचे विशेषतः मुख्यमंत्री यांच्या ताब्यात असलेल्या सामान्य प्रशासनाला चांगलेच चिमटे काढले.

खडसेंनी पॉईंट इन्फॉर्मेशचा मुद्दा विधानसभामध्ये उपस्थित केला. मंत्रालयात 3 लाख 37 हजार उंदीर असल्याची बाब समोर आली . यात काळे उंदीर, पांढरे उंदीर, गलेलठ्ठ उंदीर, माजलेले उंदीर, नुकतेच जन्मलेले उंदीर असे विविध प्रकार निघाले.

मग उंदीर मारण्यासाठी ठेका देण्यात आला. या कंपनीला 6 महिन्याची मुदत  देण्यात आली. त्यानंतर ही मुदत कमी करत 3 महिने दिली गेली. या बहाद्दर कंपनीने 3 लाख 37 हजार उंदीर केवळ सात दिवसात मारले. म्हणजे एका मिनिटात 34 उंदीर , दिवसाला 44 हजार उंदीर मारले . म्हणजेच दिवसभरात वजनानुसार एक ट्रॅकभर उंदीर या कंपनीने मारले.

एक ट्रक उंदीर मारले असतील तर त्यांना विल्हेवाट लावताना कुणी कसं पाहिलं नाही? या उंदीर कुठे पुरले, त्यांना कुठे जाळले याची कुठेही नोंद नाही. यासाठी किती विष लागलं? मंत्रालयात विष आणलं कसं? त्याला परवानगी दिली कुणी? त्याची नोंद कुठे ? धर्मा पाटील यांनी जे विष घेतलं ते हेच विष होतं ? या प्रश्नांची उत्तरं द्या अशी मागणी एकनाथ खडसेंनी लावून धरली.

अहो पण या उंदरांचं उत्तर घ्यायचं कुणाकडे? असा सवाल पिठासीन अधिकारी अब्दुल सत्तार यांनी उपस्थित केला. खडसेंनी उत्तर दिलं हा विषय सामान्य प्रशासनाचा आहे. सामान्य प्रशासन विभाग मुख्यमंत्री यांच्याकडे आहे हे लक्षात येताच सभागृहात हास्यकलोळ थांबत कमालीची शांतता पसरली.

यावर खडसे यांनी पुन्हा प्रश्न उपस्थित केला जर महापालिकेनुसार मुंबईत सर्व शहरभर 6 लाख उंदीर आहेत मग एकट्या मंत्रालयात 3 लाख 37 हजार उंदीर कसे? जर मंत्रालयात इतके कुरतडणारे उंदीर असतील तर राज्यातील शासकीय कार्यालय आणि महामंडळात किती उंदीर असतील असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर उपस्थितांमध्ये पुन्हा खसखस पिकल.

First published: March 22, 2018, 4:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading