खडावली-टिटवाळादरम्यान रुळाला तडा; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

खडावली-टिटवाळादरम्यान रुळाला तडा; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कल्याण-नाशिक रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 5 जानेवारी: कल्याण-नाशिक रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. खडावली-टिटवाळादरम्यान रुळाला तडा गेला आहे. याचा मध्य रेल्वेची वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा..

दरम्यान, मध्य रेल्वेच्या वतीने पादचारी पुलाच्या कामासाठी विद्याविहार ते मुलुंड (Vidyavihar to Mulund) दरम्यान रविवारी स. 11.30 ते सायं 4.00 या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. विक्रोळी स्थानकातील पादचारी पुलाच्या कामसाठी रविवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 5 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात आला. त्याचबरोबर या मार्गावर विद्याविहार ते मुलुंड या दरम्यानही पादचारी पुलाचे काम करण्यात येणार आहे. तर रविवारच्या मेगाब्लॉकमधून पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांची सुटका झाली आहे.

मध्य रेल्वेच्या वतीनं चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी शनिवारी रात्रीपासून देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. मध्य रेल्वे मुख्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग, सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे अप व डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. तर 6 आणि 7 जानेवारीला पश्चिम रेल्वेवर वांद्रे यार्डामध्ये जम्बोब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांनी रविवारीचे वेळापत्रक पाहून घराबाहेर पडावे.

कुठे आणि कधी असेल मेगाब्लॉक?

मध्य रेल्वे-

मुख्य मार्ग मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग- स. 11.30 ते सायं 4.00

या ब्लॉकदरम्यान कल्याणहून सुटणाऱ्या जलद लोकल दिवा ते परळ स्थानकादरम्यान धिम्या मार्गावर धावतील. परळनंतर लोकल पुन्हा जलद मार्गावर पूर्ववत होणार आहेत. सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद आणि अर्ध जलद लोकल ब्लॉकवेळी घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकात थांबणार आहेत.

हार्बर रेल्वे

सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे अप व डाऊन मार्ग- (अप मार्ग) स. 11.10 ते दु. 3.40 वा. आणि (डाऊन मार्ग) स. 11.40 ते सायं. 4.10

या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी, वडाळा ते वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रे, गोरेगाव दरम्यानच्या दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2020 10:46 AM IST

ताज्या बातम्या