मुंबई, 19 मे -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे ( Ketaki Chitale Case )सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.राज्यात ठिकठिकाणी तिच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहे. पण, केतकीचे वय पाहता तिला एखादा इशारा देऊन तिला सोडून द्यायला पाहिजे, असा सल्ला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी राष्ट्र्वादीला दिला आहे.
केतकी चितळेनं शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. भाजपच्या नेते देवेंद्र फडणवीस यांनीही तिच्या या कृत्यावर निषेध व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे, पंकजा मुंडे यांनी केतकी चितळे प्रकरणावर नवी भूमिका मांडली आहे.
केतकीने जी पोस्ट शेअर केली आहे, ते बिभत्सपणाचे आहे, पण तिचं वय पाहिलं तर तिला एक इशारा देऊन सोडून दिलं पाहिजे. सोशल मीडियाचा वापर आपण कसा केला पाहिजे, हा व्यक्ती स्वाातंत्र्याचा विषय असला तरी सर्वांचा सन्मान राखला पाहिजे. टीका जरी करायची असेल तर त्यामध्ये बिभत्सपणा नसावा. त्या पोस्टमध्ये बिभत्सपणा मला पाहण्यास मिळाला मी त्याचा निषेध करते'असं परखड मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं.
(दक्षिण महाराष्ट्रासाठी पुढचे 3 तास Alert! विजांच्या कडकडाट, वादळी पावसाची शक्यता)
मी लहानपणापासून राजकारण जवळून पाहिलं आहे. त्यावेळी काही सोशल मीडिया नव्हता. तेव्हा लोक पेपरमध्ये लिहायचे, तेव्हाही भाषा घसरायची. तेव्हा बाबांना विचारायचे तुम्ही सहन का करतात. त्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असं सांगायचे. पण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आता वेगळाचा अर्थ काढला जात आहे. पवारसाहेब हे मोठे नेते आहे, अशी प्रतिक्रियाही पंकजा मुंडे यांनी दिली.
केतकीला 'तो' मेसेज कुणी पाठवला, ती व्यक्ती कोण?
दरम्यान, केतकी चितळेने फेसबुकवर पोस्ट टाकली त्याबद्दल सायबर सेलच्या मदतीने तपास केला जात आहे. पोलिसांनी तिचा लॅपटॉप आणि मोबाईल ताब्यात घेतला आहे. त्याची तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. केतकीने मोबाईलमधील मेसेज डिलीट केले असण्याची शक्यता आहे. यासाठी तिचा मोबाईल फॅारेन्सिक चाचणीकरता पाठवणार आहे. तसंच तिने फेसबुकवर केलेली पोस्ट ही २०२० ची पोस्ट तीने आता का केली याचा शोध घेतला जाणार आहे, अशी माहिती ठाणे पोलीस सूत्रांनी दिली आहे.
विशेष म्हणजे, केतकी व्हॉटसअॅप वापरत नव्हती मात्र ती सोशल मीडिया सॅव्ही आहे. त्यामुळे ती इतरांशी संपर्कात राहण्यासाठी कशाचा वापर करत होती याचा पोलीस तपास करणार आहे. कारण पोलिसांना संशय आहे की, केतकीला कोणा एका व्यक्तीनं अथवा ग्रुपने ती पोस्ट दिली आहे असा संशय आहे. त्याचा तपास पोलीस करत आहेत.
केतकीची पोस्ट नेमकी काय आहे ?
अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. केतकीने 'तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक.. अशी कविता पोस्ट केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.