Home /News /mumbai /

केतकी चितळे प्रकरणात धक्कादायक माहिती, 'ती' पोस्ट अजून डिलीट का नाही?

केतकी चितळे प्रकरणात धक्कादायक माहिती, 'ती' पोस्ट अजून डिलीट का नाही?


अभिनेत्री केतकी चितळेने शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी आज नवीन खुलासा झाला आहे.

अभिनेत्री केतकी चितळेने शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी आज नवीन खुलासा झाला आहे.

अभिनेत्री केतकी चितळेने शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी आज नवीन खुलासा झाला आहे.

मुंबई, 24 मे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला (ketkai chitale) अटक करण्यात आली आहे. तिच्या फेसबुक पोस्टवरून राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहे. पण, राज्यभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होऊन सुद्धा केतकीची पोस्टच डिलीट करण्यात आली नसल्याची माहित अभिनेत्री केतकी चितळेने शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी आज नवीन खुलासा झाला आहे. केतकी चितळे हिने जी पोस्ट फेसबुकवर केली होती ती अद्यापही तशीच आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.  केतकीला अटकही झाली मात्र अद्याप ही पोस्ट हटवली का नाही गेली अशी चर्चा रंगली आहे. केतकीच्या फेसबुक पोस्टला सध्या 13 हजार लाईक आणि 11 हजार कमेंट्स मिळालेल्या आहेत. एखादी वादग्रस्त पोस्ट असेल तर ती पोलिसांकडून तात्काळ हटवली जाते मात्र या प्रकरणात ही पोस्ट का हटवली गेली नाही असा सवाल उपस्थितीत झाला आहे. (कधीतरी आमच्या आयुष्यात पण डोकवा..' अमृता खानविलकरनं कुणासाठी जोडले हात?) दरम्यान,  केतकीच्या अडचणी वाढत चालल्या आहेत.  केतकी चितळेला 7 जूनपर्यंत ठाणे कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 2020 च्या अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्यात ठाणे न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याच प्रकरणात आरोपीचे वकील वसंत बनसोडे जामीन अर्ज दाखल केला आहे. नवी मुंबईमधील रबाळे येथे दाखल असलेल्या अ‍ॅट्रोसिटी गुन्ह्यातील पोलीस कोठडी संपल्याने केतकी चितळेला पुन्हा ठाणे कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी नवी मुंबई पोलीस केतकी चितळेची पुन्हा पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 2020 साली केतकी चितळेवर रबाळे पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला होता.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या