S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

रेल्वे प्रशासनाच्या सूचनेनंतरही केडीएमसी फेरीवाले हटवेना

कल्याण डोंबिवली महापालिकेला रेल्वे प्रशासनाने पत्र लिहिलं होतं. या पत्रात अवैध फेरीवाल्यांना डोंबिवलीच्या स्टेशन जवळील परिसरातून आणि डोंबिवली स्टेशन बाहेरील स्कायवॉकवरून हटवावे असा स्पष्ट उल्लेख रेल्वे प्रशासनाने केला आहे.यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनाही प्रचंड त्रास होतोय असंही या पत्रात म्हटलं आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 21, 2017 09:09 PM IST

रेल्वे प्रशासनाच्या सूचनेनंतरही केडीएमसी फेरीवाले हटवेना

डोंबिवली,21 ऑक्टोबर: आज मुंबईतील अनेक स्थानकांसह कल्याण डोंबिवलीतील स्थानंकावरही मनसेने फेरीवाल्यांना हटवलं. पण कल्याण डोंबिवली स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांना हटवा असं पत्रच काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला लिहिल्याची माहिती आता पुढे येते आहे.

पण त्याबबत काहीच कारवाई करण्यात आली नाही.

कल्याण डोंबिवली महापालिकेला रेल्वे प्रशासनाने पत्र लिहिलं होतं. या पत्रात अवैध फेरीवाल्यांना डोंबिवलीच्या स्टेशन जवळील परिसरातून आणि डोंबिवली स्टेशन बाहेरील स्कायवॉकवरून हटवावे असा स्पष्ट उल्लेख रेल्वे प्रशासनाने केला आहे.यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनाही प्रचंड त्रास होतोय असंही या पत्रात म्हटलं आहे.पण इतके स्पष्ट उल्लेख केला असूनसुद्धा यावर कुठलीच कारवाई कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनी केली नाही.डोंबिवलीत आज सकाळी मनसेनं रेल्वे स्टेशन परिसरातल्या फेरीवाल्यांना हटवलं. परंतु, त्यांच्या आंदोलनानंतर हेच फेरीवाले पुन्हा संध्याकाळी परतले. . त्यामुळे फेरीवाल्याचं प्रमाण शहरात वाढलं. आणि आज मनसेनं हे आंदोलन करत फेरीवाल्याना हटवलं. फेरीवाल्यांना हटवलं, आंदोलन केलं पण संध्याकाळी पुन्हा फेरीवाल्यांनी त्याच जागेवर ठाण मांडलं

त्यामुळे आता हा फेरीवाल्यांच्या प्रश्नात प्रशासन नक्की लक्ष घालणार आहे की नाही हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 21, 2017 09:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close