पदभार स्वीकारताच विजय सुर्यवंशी यांचा KDMCच्या माजी आयुक्तांना दणका

पदभार स्वीकारताच विजय सुर्यवंशी यांचा KDMCच्या माजी आयुक्तांना दणका

बदली आदेश आल्यानंतर जाता जाता नगररचना विभागात त्यांनी काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

  • Share this:

कल्याण, 20 फेब्रुवारी : कल्याण डोंबिवलीचे तत्कालीन आयुक्त गोविंद बोडके यांची बदली मागील आठवड्यात झाली. हा बदली आदेश आल्यानंतर जाता जाता नगररचना विभागात त्यांनी काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र या बदल्या आता वादाच्या भोवर्यात सापडण्याची चिन्हे आहेत.

या सर्व प्रकरणात आर्थिक व्यवहार असल्याची कुणकुण महापालिकेत चालू असली तरी प्रत्यक्षात मात्र अद्याप काही सामोरे आलेले नाही. राज्य शासनाने आयुक्त गोविंद बोडके यांची 13 फेब्रुवारी रोजी बदली केली . नवे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दुसऱ्याच दिवशी त्यांच्याकडून आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. असे असतानाही गोविंद बोडके यांनी जाता जाता बदल्या केल्या.

नगररचना विभागातील बांधकाम परवानग्या , मालमता विभागातील होर्डींग्जच्या परवाने आणि बांधकाम विभागातील विविध विकास कामांचे कोट्यवधी रुपयांच्या प्रस्तावाना देखील गोविंद बोडके यांनी मंजूर केल्या आहेत. यावर तारखेचा खेळ खेळत मंजूर करण्यात आल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

या संदर्भात राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी या बदल्या रोखण्याची मागणी देखील केली. नवे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्यापर्यंतही याबाबतच्या तक्रारी पोहोचल्याने याप्रकरणाची माहिती व अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. अखेर या बदली प्रकरणाची गंभीर दखल घेत केलेल्या 17 अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या असून एकप्रकारचा दणकाच दिला आहे.

First published: February 20, 2020, 11:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या