S M L

कोणाच्या वरदहस्तामुळे घरतला मिळतेय व्हीआयपी ट्रीटमेंट?

रक्तदाबाचा त्रास होत असल्यानं घरतला उपचारांसाठी ठाण्यातील रूक्मिणी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र या ठिकाणी आरोपी घरतला व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात आल्याचं उघड झालंय.

Sonali Deshpande | Updated On: Jun 20, 2018 04:24 PM IST

कोणाच्या वरदहस्तामुळे घरतला मिळतेय व्हीआयपी ट्रीटमेंट?

मुंबई, 20 जून : लाचखोर संजय घरतला व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याच समोर आलंय. अटक झाल्यानंतर आधारवाडी जेलऐवजी घरतचा मुक्काम रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये  आहे. रक्तदाबाचा त्रास होत असल्यानं घरतला उपचारांसाठी ठाण्यातील रूक्मिणी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र या ठिकाणी आरोपी घरतला व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात आल्याचं उघड झालंय.

घरतच्या दिमतीला केडीएमसीचे दोन कर्मचारीही आहेत. त्यामुळे घरतला ही व्हीआयपी ट्रिटमेंट कोणाच्या वरदहस्तामुळे मिळतेय, अशी चर्चा सुरू आहे.

3 जूनला कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त संजय घरतला 35 लाख रुपये घेताना अटक करण्यात आलीये. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना त्याला अटक केली आहे.



अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी त्याने 45 लाखांची लाच मागितली होती. त्यातले 35 लाख रुपये घेताना त्याला अटक झाली आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. पैसे दिले नाहीत तर कारवाई होईल अशी धमकीही त्याच्याकडून देण्यात आली होती. 3 दिवसांपासून ठाणे एसीबीनं सापळा रचला होता आणि आज अखेर त्याला अटक करण्यात आली.

हेही वाचा

शरद पवारांचा 'खास' निरोप घेऊन जितेंद्र आव्हाड राज ठाकरेंच्या भेटीला!

Loading...
Loading...

सोलापूरच्या अनिता माळगेंचं पंतप्रधानांनी मराठीत केलं कौतुक

जगभरातील पासपोर्टच्या या 4 रंगांचा हा आहे अर्थ !

कोण आहे घरत ?

घरत कल्याण-डोंबिवली महापालिकेत सन १९९५ पासून कार्यरत असून सहायक उपायुक्तपदी असलेल्या घरत यांनी आतापर्यंत सामान्य प्रशासन, घनकचरा व्यवस्थापन, परिवहन, बीएसयूपी पुनर्वसन समितीचे प्रमुख, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग अशा महत्त्वाच्या विभागांचा कार्यभार पाहिला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या काळात गैरवर्तन करणे, त्याचबरोबर मतदार याद्या बनवण्यात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा करणे, मतदान केंद्रे निश्‍चित करण्यास दिरंगाई असे ठपके त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. केडीएमसीचा परिवहन उपक्रम ज्या वेळी अस्तित्वात आला, त्या वेळी तेथील व्यवस्थापन उपायुक्त घरत यांच्याकडे देण्यात आले होते. परंतु तिकीट, इंजिन, डिझेल-फिल्टर यांच्या घोटाळ्यांचे आरोप झाले. जुलै २00५ च्या प्रलयंकारी महापुरात उपक्रमातील तिकिटे भिजल्याचे भासवून ती महापालिकेच्या गेस्ट हाऊसमध्ये लपवून ठेवण्यात आली होती. यानंतर, या तिकिटांचा गैरवापर करण्यात आला. यात एका वाहकावर फौजदारी गुन्हाही दाखल झाला.

घरत यांच्या कालावधीतील हा तिकीट घोटाळा चांगलाच गाजला होता. परंतु, या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवरील कारवाई प्रलंबित आहे. इंजीन घोटाळ्याबाबतही एमएफसी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल आहे. इंजीन अदलाबदलप्रकरणी चौकशी अहवालात तत्कालीन कार्यशाळा व्यवस्थापक विश्‍वनाथ बोरचटे, प्रमुख कारागीर अनंत कदम हे दोषी असल्याचे निष्पन्न झाले.

या दोषी अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवण्यात तत्कालीन उपायुक्त घरत हे सक्षम ठरले नाहीत. त्यामुळे तेदेखील दोषी असल्याचा ठपकाही संबंधित अहवालात ठेवण्यात आला आहे. परंतु, याप्रकरणीही आजवर प्रशासनाकडून ठोस कारवाई झालेली नाही.

त्यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारीदेखील सोपवण्यात आली होती.

परंतु, तेथेही त्यांनी आपला ठसा न उमटवल्याने केडीएमसीच्या नाकर्तेपणावर उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढल्याकडे तत्कालीन आयुक्त मधुकर अर्दड यांनी विशेष अहवालाद्वारे राज्य शासनाचे लक्ष वेधले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 20, 2018 03:40 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close