मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

महिला IPS अधिकाऱ्याने KBC मध्ये जिंकले 1 कोटी रुपये, मात्र या प्रश्नामुळे आणखी मोठं स्वप्न भंगलं

महिला IPS अधिकाऱ्याने KBC मध्ये जिंकले 1 कोटी रुपये, मात्र या प्रश्नामुळे आणखी मोठं स्वप्न भंगलं

नेव्ही ऑफिसर असलेल्या मोहिता शर्मा यांनी देखील एक कोटी रुपये जिंकले आहेत.

नेव्ही ऑफिसर असलेल्या मोहिता शर्मा यांनी देखील एक कोटी रुपये जिंकले आहेत.

नेव्ही ऑफिसर असलेल्या मोहिता शर्मा यांनी देखील एक कोटी रुपये जिंकले आहेत.

  • Published by:  Akshay Shitole
मुंबई, 18 नोव्हेंबर : हिंदी मनोरंजन वाहिनीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात दुसऱ्या स्पर्धकाने एक कोटी रुपये जिंकले आहेत. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमात नाझिया नसीम नावाच्या महिलेने 1 कोटी रुपये जिंकल्यानंतर आता नेव्ही ऑफिसर असलेल्या मोहिता शर्मा यांनी देखील एक कोटी रुपये जिंकले आहेत. या वेळी हॉटसीटवर त्यांनी आपल्या प्रतिभेने आणि ज्ञानाने अमिताभ बच्चन यांचे मन जिंकले. 3,20,000 रुपये जिंकेपर्यंत त्यांनी एकही लाईफ लाईन वापरली नव्हती. 1 कोटी रुपयांच्या प्रश्नासाठी त्यांनी एक्स्पर्टची मदत घेत या प्रश्नाचे उत्तर दिलं. जॉर्ज फ्रेडरिक हेनिंग यांच्या स्फोटकांच्या पेटंटवर आधारित प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तज्ज्ञाची मदत त्यांनी घेतली. नॅशनल सिक्युरिटी अ‍ॅडव्हायझर होण्याची इच्छा असणाऱ्या मोहिता यांना 7 कोटींच्या प्रश्नाचे उत्तर देता न आल्याने त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. हा होता प्रश्न 1817 मध्ये वाडिया ग्रुपने मुंबईमध्ये बांधलेली यापैकी कोणती सर्वांत मोठी ब्रिटिश युद्धनौका अद्याप समुद्रात आहे. या प्रश्नाचं उत्तर होतं, एचएमएस ट्राईनकोमली. एचएमएस ट्राईनकोमली ही युद्धनौका 1817 मध्ये सेवेसाठी ब्रिटिश रॉयल नेव्हीमध्ये दाखल झाली होती. त्यानंतर 80 वर्षांच्या सेवेनंतर ती निवृत्त झाली. 1800 आणि 1830 दरम्यान या युद्धनौकेचे बांधकाम करण्यात आले होते. 1860 नंतर पुन्हा एकदा प्रशिक्षणासाठी हे जहाज वापरलं जाऊ लागलं. वाडिया ग्रुपने मुंबईत बांधलेली ही युद्धनौका खास सागवानी लाकडापासून तयार करण्यात आली होती. 1782 मध्ये झालेल्या ट्राइनकोमली युद्धाच्या स्मृतीप्रीत्यर्थ या बोटीचं नाव ट्राइनकोमली ठेवण्यात आलं होतं. अनेक वर्ष या युद्धनौकेने जगभरात सेवा बजावली असून अटलांटिक सागरात या युद्धनौकेने पेट्रोलिंग केलं आहे. या नौकेच्या बांधकामासाठी अंदाजे 22,67,870 रुपये खर्च आला होता. तिच्या बांधकामानंतर 18 महिन्यांनंतर ती सेवेसाठी दाखल झाली होती आणि कॅप्टन फिलिप हेन्रीने तिला पोर्टलमाऊथ डॉकयार्डला प्रवासाला नेलं. आता राष्ट्रीय ऐतिहासिक फ्लीटचा भाग असलेली एचएमएस ट्राईनकोमली हार्टलपूलमधील रॉयल नेव्हीच्या राष्ट्रीय संग्रहालयात पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे.
First published:

Tags: Amitabh Bachchan

पुढील बातम्या