• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • कतरीनाची बहीण इसाबेल बॉलीवूड पदार्पणासाठी सज्ज! मार्चमध्ये चित्रपट होणार प्रदर्शित

कतरीनाची बहीण इसाबेल बॉलीवूड पदार्पणासाठी सज्ज! मार्चमध्ये चित्रपट होणार प्रदर्शित

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरीना कैफची छोटी बहीण इसाबेल कैफ लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

 • Share this:
  मुंबई,20 फेब्रुवारी :  बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरीना कैफची छोटी बहिण इसाबेल कैफ  लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.इसाबेल ही ‘सुस्वागतम खुशामदीद’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात इसाबेल सोबत अभिनेता पुलकित सम्राट दिसून येणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण नुकताच पूर्ण झालं आहे. चित्रीकरणाचे फोटो सतत सोशल मीडियावर पोस्ट होत आहेत. इसाबेल स्वतः सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सतत आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. कतरीना प्रमाणेच इसाबेलसुद्धा सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. तिने केलेल्या पोस्टला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असते. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच ती चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. ‘सुस्वागतम खुशामदीद ‘ हा चित्रपट सामाजिक सौजन्यावर आधारित आहे. धीरज कुमार यांनी या चित्रपटाच दिग्दर्शन केलं आहे. इसाबेलने यामध्ये ‘नूर’ अशी व्यक्तिरेखा साकारली आहे. नुकताच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर इसाबेलने चित्रपटातील एक फोटो शेअर केला आहे. त्यात ती अभिनेता पुलकित सम्राट सोबत दिसून येत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Isabelle Kaif (@isakaif)

  अभिनेता पुलकित सम्राटने मीडियासमोर इसाबेलच कौतुक करत म्हंटल आहे. इसाबेल आपल्या कामाच्या बाबतीत खूपच कष्ट घेते. तिच्यासोबत काम करून आनंद झाला.तर सेट वरील सर्वच लोक इसाबेलचं सतत कौतुक करत असतात. हे पहा :सैराटनंतर आता झूंड घालणार प्रेक्षकांना भूरळ! येतोय नागराजचा पहिला बॉलिवूडपट या चित्रपटात पुलकितने दिल्लीतील मुलगा ‘अमन’ अशी व्यक्तिरेखा साकारली आहे.तर इसाबेलने आग्र्याची मुलगी असणारी ‘नूर’ची भूमिका केली आहे.येत्या मार्चमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इसाबेल बहिण कटरीना सारखीच अतिशय सुंदर आणि स्टाईलीश आहे. तसेच ‘टाईम टू डांस’ या चित्रपटातही ती झळकणार आहे. ती सुद्धा बहिण कटरीना सारखी चाहत्यांच्या पसंतीला कशी उतरते हे पाहणं औस्तुक्याच ठरेल.
  Published by:Aiman Desai
  First published: