Home /News /mumbai /

मुंबईतील संख्या वाढली, कस्तुरबा रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

मुंबईतील संख्या वाढली, कस्तुरबा रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

कस्तुरबा इथं आयाबाई म्हणून काम करणारी 44 वर्षीय महिला संक्रमित झाली आहे.

    मुंबई, 31 मार्च : मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. स्तुरबा रुग्णालयातील एका महिला कर्मचारीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. कस्तुरबा इथं आयाबाई म्हणून काम करणारी 44 वर्षीय महिला संक्रमित झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या महिलेचं टिटवाळा पूर्व येथे वास्तव्य होतं. मात्र सदर महिलेच्या कुटुंबातील इतर लोक गावी असल्याने बुधवारपासून त्या घरी गेल्या नव्हत्या. याबाबत कस्तुरबा रुग्णालयाच्या म्युनिसिपल कामगार संघाने माहिती दिली आहे. या महिला कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याने कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ योग्य सेफ्टी किट पुरवण्याची कर्मचारी संघानी मागणी केली आहे. दरम्यान, देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 1251 वर पोहोचली आहे. सोमवारी राजस्थान, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशसह देशाच्या विविध भागांत कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे समोर आली आहेत. दिवसभरात 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुजरात, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. सोमवारी महाराष्ट्रात 216 लोक संसर्गित झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 39 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी महाराष्ट्रात दोन लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी एकाचा मृत्यू पुण्यात आणि दुसरा मृत्यू हा मुंबईत झाला.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या