कर्नाटकाचा कल भाजपच्या बाजूने येताच शेअर बाजारात 370 अंकांची उसळी

कर्नाटकाचा कल भाजपच्या बाजूने येताच शेअर बाजारात 370 अंकांची उसळी

कर्नाटकाचा कल भाजपच्या बाजूने येताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला आहे. शेअर बाजारात 370 अंकांची उसळी मारली आहे.

  • Share this:

मुंबई, 25 मे : कर्नाटकाचा कल भाजपच्या बाजूने येताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला आहे. शेअर बाजारात 370 अंकांची उसळी मारली आहे. कर्नाटक निवडणुकीच्या मतमोजणीचा आणि भाजपच्या बहुमताचा थेट परिणाम शेअर बाजारावर झालेला पहायला मिळतो. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली. सुरूवातीचा काही काळ काँग्रेसने आघाडी मारली होती. मात्र, त्यानंतर भाजपाने जोरदार मुसंडी मारत काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) या दोन्ही पक्षांना बरेच पाठी टाकले.

भाजपचे आकडे जसजसे वाढले कसे लगेच सेन्सेक्स तब्बल 200 अंकांनी वधारला. तर निफ्टी 10850 च्या पातळीवर जाऊन पोहोचला. त्यामुळे शेअर बाजारात मोदींच्या विजयाचं स्वागत करण्यात आलं आहे. असं म्हणायला हरकत नाही.

कर्नाटक विधानसभेच्या २२४ पैकी २२२ जागांसाठी १२ मे रोजी ७२ टक्के मतदान झाले होते. त्यात आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, भाजपा 115, काँग्रेस 65, जनता दल (सेक्युलर) 40 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, हे आकडे जर असेच राहिले तर कर्नाटकात भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करण्यात यशस्वी होईल.

First published: May 15, 2018, 11:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading