Home /News /mumbai /

करीम लाला-इंदिरा गांधी भेटीच्या वक्तव्यवर काँग्रेस आक्रमक, राऊतांची उडवली खिल्ली

करीम लाला-इंदिरा गांधी भेटीच्या वक्तव्यवर काँग्रेस आक्रमक, राऊतांची उडवली खिल्ली

शिवसेनेच्या शायरने महाराष्ट्राचे मनोरंजन करणे चांगले राहील, अशा शब्दांत काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे.

    मुंबई,16 जानेवारी: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुण्यात बुधवारी झालेल्या लोकमतच्या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत माफिया डॉन करीम लाला आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भेटीविषयीचे वक्तव्य केले होते. संजय राऊत यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी केली आहे. दुसरीकडे, शिवसेनेच्या शायरने महाराष्ट्राचे मनोरंजन करणे चांगले राहील, अशा शब्दांत काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे. काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांनी ट्विटरद्वारे संजय राऊतांवर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेनेने काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन केले आहे. आता संजय राऊत यांच्या इंदिरा गांधीच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते नाराज झाले आहेत. काय म्हणाले संजय निरुपम..? 'शिवसेनेच्या शायरने इतरांच्या हलक्या-फुलक्या शायरी ऐकवत महाराष्ट्राचे मनोरंजन करणेच चांगले राहील. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी अपप्रचार केल्यास त्यांच्यावर पश्चातापाची वेळ येईल. काल त्यांनी इंदिरा गांधींविषयी केलेले वक्तव्य मागे घ्यावे' असे संजय निरुपम यांनी ट्वीट केले आहे. बोलण्यापूर्वी संयम राखावा.. इंदिराजी या खऱ्या देशभक्त होत्या. त्यांनी देशाच्या सुरक्षेशी कधीच तडजोड केली नाही. मुंबई काँग्रेसचा माजी अध्यक्ष या नात्याने मी संजय राऊत यांच्याकडे चुकीची माहिती देणारे वक्तव्य मागे घेण्याची मागणी करतो. तसेच राजकीय नेत्यांनी दिवंगत पंतप्रधानांविषयी बोलण्यापूर्वी संयम राखला पाहिजे, असे ट्वीट काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी केले आहे. संजय राऊतांनी दिले स्पष्टीकरण.. माफिया गुंड करीम लाला याला इंदिरा गांधी भेटायच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी यावेळी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, देशातील अनेक नेते, मंत्री करीम लाला याला भेटत होते. तसेच इंदिरा गांधी देखील भेटत होत्या. करीम लाला पठाण संघटनेचा अध्यक्ष होता. या संघटनेला अनेक नेते भेटत होते. इंदिरा गांधींबद्दल माझ्याएवढा आदर कुणी दाखवला नाही. इंदिरा गांधींवर टीका झाली त्यावेळी काँग्रेसवालेही शांत होते, असे संजय राऊत म्हणाले होते. वेळी काँग्रेसवालेही शांत होते, असे संजय राऊत म्हणाले.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या