मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईहून 100 दिवसांमध्ये लंडन! मराठी तरुण 24 देशांमधून करणार बाईकनं प्रवास, Video

मुंबईहून 100 दिवसांमध्ये लंडन! मराठी तरुण 24 देशांमधून करणार बाईकनं प्रवास, Video

X
Mumbai

Mumbai News : कऱ्हाडमधील एक मराठी तरुण मुंबई ते लंडन हा प्रवास बाईकनं करणार आहे.

Mumbai News : कऱ्हाडमधील एक मराठी तरुण मुंबई ते लंडन हा प्रवास बाईकनं करणार आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Mumbai, India

  नुपूर पाटील, प्रतिनिधी

  मुंबई, 21 मार्च : जग भ्रमंती करण्याची आवड ही गेल्या अनेक शतकांपासून कायम आहे. यापूर्वीच्या शतकात समुद्रमार्गे जगाची भ्रमंती केली जात असे. नव्या संशोधनानंतर दळणवळणाची साधनं वाढली. त्याचा फायदा पर्यटकांना झाला. जगभ्रमंतीची अनेक माध्यमं त्यांना उपलब्ध झाली. सध्या बाईकहून जगाची भ्रमंती करण्याची अनेक रायडर्सची इच्छा असते. कऱ्हाडमधील एक तरुणही आता मुंबई ते लंडन हा प्रवास बाईकनं करण्यासाठी सज्ज झालाय.

  कसा आहे प्रवास?

  योगेश आलेकारी असं या तरुणाचं नाव आहे. योगेश नुकताच मुंबईमध्ये आला होता. त्यावेळी त्यानं त्याचा आजवरचा अनुभव तसंच जगभ्रमंतीबाबत माहिती दिली. गेल्या सहा ते सात वर्षांपासून योगेश बाईक रायडींग करत आहे. सुरुवातीला महाराष्ट्रातील गडकिल्ले ट्रेकिंग करून, बाईक रायडींग करून सर केले त्यानंतर भारतात 1 लाख किलोमीटरपेक्षा जास्त बाईक रायडींग केलंय.

  योगेशनं आता मुंबई ते लंडन असा बाईकनं प्रवास करण्याचा निश्चय केलाय. तो 24 देश आणि 3 खंडांमधून 25000 किलोमीटर प्रवास करणार आहे.  महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी त्याचा हा प्रवास सुरू होणार असून 100 दिवसांमध्ये तो हा प्रवास पूर्ण करेल.

  पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांनी अनुभली मायेची ऊब, 'या' महिलांकडून मिळतंय मोफत जेवण, Video

  योगेशच्या डोक्यात गेल्या 4 वर्षांपासून हा प्लॅन होता. त्यानं यापूर्वी नेपाळ, भूतान, म्यानमार बॉर्डर, व्हिएतनाम, कंबोडिया या देशांमध्ये बाईकनं प्रवास केला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाईक राईडचा प्लॅन करणं सोपं नसतं याची त्याला जाणीव आहे. प्रत्येक देशात जाताना वेगवेगळे कागदपत्र तसेच स्वतःची बाईक न्यायची असल्यास बाईक पासपोर्ट, इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स अश्या विविध गोष्टी यासाठी गोळा कराव्या लागतात. हे सर्व गोळा करण्यात मी वर्षभरापूर्वीच कामाला लागला होतो. या कालावधीमध्ये एकही दिवस मी सुट्टी घेतली नाही, असं योगेशनं सांगितलं. त्याला या प्रवासासाठी 30 लाखांपर्यंतचा खर्च येणार आहे.

  काय घ्यावी लागते काळजी?

  बाईक राईड करताना फिजिकल फिटनेसबरोबरच बाईकचा फिटनेसचीही काळजी घ्यावी लागते. ऊन, वारा, पाऊस, वादळ या प्रकारच्या वेगवेगळ्या नैसर्गिक बदलांना समोर जाऊन टार्गेट पूर्ण करावं लागतं. त्याचबरोबर वेगवेगळ्या भागातील खाद्यपदार्थ खावे लागतात. कारण, ते त्या भागात मानवेल असं अन्न असतं. तसंच भरपूर पाणी देखील प्यावं लागतं.

  मुंबईकर मेधानं बाईकवर केला 25 हजार किलोमीटर प्रवास, पाकिस्तानबद्दल म्हणाली... Video

   कसा असेल प्रवास?

  योगेश आशिया, युरोप, आफ्रिका हे तीन खंड फिरणार आहे. 1 मे रोजी तो मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथून निघणार आहे. मुंबई ते नेपाळ बाईक राईड करून पुढे विमानाने यु ए ई पर्यंत जाईल तेथून इराण, तुर्की, ग्रीस, इटली, ऑस्ट्रीया,झेक,जर्मनी, लक्सेमबर्ग,बेलजीअम, नेदरलँड, फ्रांस, लंडन पून्हा फ्रान्स, स्विस पुन्हा फ्रांस, मोरक्को व स्पेन असा बाईकने प्रवास करून स्पेन येथून भारतात विमानाने परतणार आहे. अश्या पद्धतीने बाईकस्वारीचा थरार अनुभव तो घेणार आहे.

  First published:
  top videos

   Tags: Bike, Local18, Mumbai, Travel