Home /News /mumbai /

कंगनाच्या वक्तव्यामुळे मुंबई पोलिसांचा अपमान, पण.., फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

कंगनाच्या वक्तव्यामुळे मुंबई पोलिसांचा अपमान, पण.., फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

पावसाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर चौफेर हल्लाबोल केला.

    मुंबई, 08 सप्टेंबर : अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई आणि मुंबई  पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाद पेटला आहे. यावर पहिल्यांदाच भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली. कंगनाच्या वक्तव्यामुळे मुंबई पोलिसांचा अपमान झाले हे, फडणवीस यांनी मान्य करत निषेध केला. पण, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. पावसाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर चौफेर हल्लाबोल केला. कोरोनाच्या परिस्थिती, सुशांत सिंह राजपूत प्रकरण आणि कंगनाच्या प्रकरणावरही फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. कंगनाने जे मुंबई पोलिसांबद्दल वक्तव्य केले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांचा अपमान झाला आहे, हे मान्यच करावे लागणार आहे, असं म्हणत फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कंगनाने जे विधान केले ते केले पण या सभागृहात इतर काही नेते आहे. ज्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल बोलले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा कल्याणच्या सभेत 'पोलीस हे भांडे धुण्याचे लायकीचे आहे, पोलिसांनी भांडे धुवावे', असं वक्तव्य केलं होतं, अशी आठवणच  फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना करून दिली. तसंच, 'आपली बाजू बदलली की, भूमिका कशी बदलायची. विषयांतर कसे करायचे, आणि एखाद्या विषयाची दिशा कशी बदलायची', असं म्हणत फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख न करत टोला लगावला. दरम्यान, सोमवारी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगना राणावतवर कारवाई करावे असे पत्र दिले होते. या पत्रात मुंबई बदनामी करणाऱ्या कंगना राणावतवर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली होती. आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगना राणावतविरोधात निषेध करणारा ठराव मांडला आहे. 'मुंबईत परप्रांतीय मुलगी येते नाव कमावते आणि महाराष्ट्र मुंबईचा अपमान करत असे बेताल आणि खेद जनक वक्तव्य करते. महाराष्ट्राची बदनामी सहन करणार नाही, मुंबई पोलीस यांची बदनामी सहन करणार नाही, असं अनिल देशमुख यांनी ठणकावून सांगितले. अनिल देशमुख यांनी मांडलेल्या या प्रस्तावाला समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांनी पाठिंबा दिली आहे. कंगना राणावतने बेताल वक्तव्य केले आहे, तिच्यावर कारवाई करा, अशी मागणी अबू आझमी यांनी केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या