Home /News /mumbai /

कंगना भाजपमध्ये प्रवेश करणार का? फडणवीसांनी केला खुलासा

कंगना भाजपमध्ये प्रवेश करणार का? फडणवीसांनी केला खुलासा

आज एका महिलेनं सरकारला पराभूत केले आहे. काय प्रतिमा राहिली सरकारची?

    मुंबई, 25 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेमध्ये वाद पेटला आहे. हा वाद आता कोर्टात पोहोचला आहे. तर दुसरीकडे भाजपने कंगनाची उघडपणे बाजू घेत ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कंगना भविष्यात भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा सवाल विचारला असता भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांनी दैनिक लोकमत या वृत्तपत्राला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. कपल चॅलेंज स्वीकारणाऱ्यांना पुणे पोलिसांचा पुणेरी टोमणा,पण दिला महत्त्वाचा सल्ला 'कंगनाला राजकारणात येण्याचा रस नाही. कंगना आणि शिवसेनेत जो वाद झाला, त्याला सरकारनेच वाढवले आहे. कंगना राणावत काही राष्ट्रीय नेत्या नाही. पण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केवळ त्यांचीच चर्चा करावी, हे योग्य आहे काय? आज एका महिलेनं सरकारला पराभूत केले आहे. काय प्रतिमा राहिली सरकारची? लोकशाहीमध्ये कुणीही राजा नसतो, हे त्यांनी लक्षात ठेवावे', असा टोलाही फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला. 'शरद पवारांना आधीच नोटीस मिळाली असती' दीपिकाच्या चौकशीदरम्यान उपस्थित राहणार रणवीर सिंह? परवानगीसाठी NCBकडे केला अर्ज 'आम्ही कुणालाही त्रास देत नाही. दोन जणांनी तक्रार केली होती त्यानुसार ती कारवाई सुरू आहे. चंद्रकांत पाटील आणि माझ्याबद्दलही तक्रार केली होती. जर आम्हाला यात राजकारण करायचे असते तर दोन महिन्यांपूर्वीच केले असते. तेव्हा ही नोटीस दिली असती. कायदा आपले काम करत आहे', असं उत्तर फडणवीसांनी दिले. 'महाराष्ट्र सोडून जाणार नाही' 'बिहार निवडणुकीसाठी भाजपने प्रभारी म्हणून नेमणूक केली. मधल्या काळात अनेक दिग्गज नेते गमावले आहे. त्यामुळे पक्षाने ही नवीन टीम केली आहे. माझी निवड झाली म्हणजे मी काही महाराष्ट्रातून निरोप घेतला असं नाही. त्यामुळे महाराष्ट्र सोडून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही', असं सांगत राष्ट्रीय राजकारणात जाणार नसल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले. 'ठाकरे सरकार स्वत: कोसळणार' 'विरोधी पक्षनेता म्हणून सरकार जिथे चुकले त्यांच्या चुका लक्षात आणून देण्याचे काम करत आहोत. कोरोना काळातही आम्ही आरोप केले. राज्यात आम्ही कोणतेही ऑपरेशन लोट्स हाती घेतले नाही. एक दिवस हे सरकार स्वत: कोसळणार आहे. त्यामुळे हे सरकार पाडण्याचा विषयच येत नाही. मुळात असे सरकार चालतच नाही. ज्या दिवशी सरकार पडले, त्यावेळी परिस्थितीनुसार, शक्य झाल्यास आणि गरजेचं वाटल्यास सरकार बनवू' असंही फडणवीस म्हणाले.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या