Home /News /mumbai /

ही तर भाजपची पोपट, काँग्रेस मंत्र्याची कंगनावर जळजळीत टीका

ही तर भाजपची पोपट, काँग्रेस मंत्र्याची कंगनावर जळजळीत टीका

केंद्रीय गृहमंत्रालयाने कंगनाला आता Y प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली आहे.

    मुंबई, 07 सप्टेंबर : मुंबईला पाकव्याप्त भाग म्हणणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध शिवसेना वाद पेटला आहे. आता तर केंद्र सरकारकडून Y प्लस दर्जाची सुरक्षा कंगनाला देण्यात आली आहे. या मुद्द्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कंगना रानावतवर जळजळीत टीका केली आहे. 'कंगना रानावतने मुंबईला पाकव्याप्त भाग असल्याचे म्हटले होते. मुंबईला कुणी पाकव्याप्त भाग म्हणत असेल  आणि त्यावर विश्वास ठेवणे म्हणजे हे देशभक्तपणा आहे का?' असा संतप्त सवाल विजय वडेट्टीवार यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना उपस्थितीत केला. विधानपरिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीची घोषणा, कोण मारणार बाजी? 'जर असं वक्तव्य करून कंगना देशभक्त ठरत असेल तर वाय  कशाला तर तिला झेड सुरक्षा द्या. कंगना ही भाजपची पोपट आहेत', अशी जळजळीत टीका विजय वड्डेटीवार यांनी केली. विशेष म्हणजे, कंगना विरुद्ध शिवसेना वाद पेटला आहे. त्यामुळे आता या वादात केंद्रीय मंत्री अमित शहांनी उडी घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने कंगनाला आता Y प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंगना राणावतविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे तिला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून  Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. राज्य सरकारने या प्रकरणात घेतलेली भूमिका पाहता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा नाही तर 'हा' खेळाडू IPL मध्ये मारू शकतो डबल सेंच्यूरी Y दर्जाच्या सुरक्षेमध्ये एकूण 11 सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. यात दोन कमांडो तैनात असतात. ही सुरक्षा 24x7 असते. आता ही सुरक्षा व्यवस्था थेट सीआरपीएफ सांभाळू शकते. आपल्याला Y दर्जाची सुरक्षा मिळाल्यामुळे कंगना राणावतने अमित  शहा यांचे आभार मानले आहे. 'मला दिलेली ही सुरक्षा हे प्रमाण आहे की, देशात कोणत्याही देशभक्ताचा आवाज कुणीही रोखू शकत नाही.' असं सांगत कंगनाने शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे. भाजप आमदाराला विधान भवनाच्या गेटवर अडवले, अजितदादांनी अधिकाऱ्यांना खडसावले 'मला वाटलं अमित शहा हे मला काही दिवस मुंबईत न जाण्याचा सल्ला देतील. पण, त्यांनी भारताच्या एका मुलीने दिलेल्या वचनाचा मान राखला आहे. माझ्या स्वाभिमान आणि आत्मसन्मानाचा आदर राखला आहे' असं म्हणत कंगनाने अमित शहा यांचे आभार मानले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या